आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या ‘बेदखल’वृत्तीमुळे दुधविक्रेत्याने दिला अखेर जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्महत्येपुर्वी भोमे यांनी लिहिलेली चिठ्ठी. - Divya Marathi
आत्महत्येपुर्वी भोमे यांनी लिहिलेली चिठ्ठी.
अमरावती - पैश्याच्या व्यवहारातून वसुलीसाठी लावलेल्या तगाद्याबाबत दिलेल्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेतल्याने आत्महत्या करावी लागत असल्याचा आरोप गाैरखेड्याचे रहिवासी नरेंद्र नामदेव भोमे (५०) या दुधविक्रेत्याने सोमवारी (दि. २) आत्महत्या करण्यापुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, भोमे यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल असल्याची माहिती बडनेरा पोलिसांनी दिली आहे. 
नरेंद्र भोमे यांनी शहरातील एका महिलेकडून दोन वर्षांपुर्वी व्याजाने ८० हजार रुपये घेतले होते. व्याजासहीत त्याची रक्कम लाखोंत गेली होती. दरम्यान या माेबदल्यात काही महिन्यांपुर्वी भोमे यांनी संबधित महीलेला त्यांच्या मालकीचा भातकुली मार्गावर असलेल्या मलकापूर येथील हजार ४५० वर्गफुट भुखंडसुध्दा नावे करून दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्यानंतरही भोमे यांच्याकडे लाख ९० हजार रुपयांसाठी सदर महीला तीचे दोन नातेवाईकांनी तगादा लावला होता. पैसे परत केल्यास म्हशी सोडून घेऊन जाणार, अशा धमक्याही दिल्या होत्या. दरम्यान डिसेंबरला वरील तिघांनी घरी येव्ून भोमे यांच्यासोबत याच कारणावरून वाद घातला होता. याबाबदची तक्रार भोमे यांनी २५ डिसेंबरला बडनेरा पोलिसात दिली होती. तक्रारीमध्ये वाद झाल्याचा उल्लेख होता. यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरही संबधित व्यक्तींकडून भोमे यांच्यामागे पैश्याचा तगादा सुरूच होता. वरंवारच्या या तगाद्याला कंटाळून नरेन्द्र भोमे यांनी बडनेरा ते गौरखेडा मार्गावर विष प्राषण केले. दरम्यान गावकऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने मला जीव गमवावा लागत आहे. परंतू त्यानंतर तरी संबधितांकडून माझ्या पत्नीला त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी, असेही भोमे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. 
 
तिघांविरुध्द गुन्हा 
- भोमेयांनीसंबधित महीलेकडून दोन वर्षांपुर्वी व्याजाने पैसे घेतले होते. असे चौकशीत पुढे आले आहे. सदर रक्कम परत मागण्यासाठी संबधित व्यक्ती भोमेकडे गेले होते. या प्रकरणी ‘एनसी’ दाखल आहे. दरम्यान सोमवारी भोमे यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.’’ दिलीप पाटील, ठाणेदार, बडनेरा. 
 
बातम्या आणखी आहेत...