आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला : पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अडीच वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या पतीपत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सिव्हिल लाईन्स परिसरातील आंबेडकर नगर महसूल कॉलनीच्या मागे बुधवारी संध्याकाळी उघडकीस आली. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होते, अशी माहिती प्रथमदर्शनी तपासात समोर आली आहे. सिद्धार्थ रमेश बावीसाने निशा सिद्धार्थ बावीसाने असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. सिद्धार्थ निशा अडीच वर्षापूर्वी प्रेमप्रकरणाला अंतिम रुप देत विवाहबंधनात अडकले होते. महिनाभरापासून दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरु होते. 
 
काही दिवसांपूर्वी सिद्धार्थचा अपघात झाला असताना त्याची पत्नी निशा ही माहेरहून तत्काळ निघून आल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने त्यांनी बुधवारी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. सिद्धार्थ निशा यांचे मृतदेह घरातील आड्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत खिडकीतून दिसून आला. त्यानंतर शेजारच्यांनी दरवाजा तोडून आत बघितले घटनेची माहिती सिव्हिल लाइन्स पोलिसांना दिली. तत्काळ ठाणेदार अन्वर एम. शेख त्यांचे सहकारी घटनास्थळावर पोहचले. 
 
घटनेचा पंचनामा केल्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. 
 
त्यांनी मलकापूरमध्ये घेतले होते घर 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थने शेतीची कामे करून शहरातील मलकापूर भागामध्ये घर घेतले होते. मात्र अपघात झाल्यानंतर आणि पत्नी माहेरी असल्याने तो आईवडिलांकडे आंबेडकर नगरात राहायला आला होता. 
बातम्या आणखी आहेत...