आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटी कर्मचारी नियुक्ती निविदा प्रक्रिया वांध्यात, प्रतिस्पर्धी कंपनीने केली तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेतील रखडलेल्या विविध कामांना चालना देण्यासाठी महापालिकेने कंपनी मार्फत कंत्राटी अभियंते नियुक्त केले आहेत. मात्र कमी दराने निविदा दाखल करणाऱ्या प्रतिस्पर्धी कंपनीने यावर आक्षेप घेतला आहे. या अनुषंगाने स्थायी समिती सभापतींनीही प्रशासनाला याबाबत माहिती मागीतल्याने ही निविदा प्रक्रियाच वांध्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनपा अस्तित्वात येऊन १६ वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही मनपातील महत्वाची तांत्रिक पदे रिक्त आहेत. महापालिकेत पाणी पुरवठा, बांधकाम, नगररचना, विद्युत विभाग आदी विविध तांत्रिक कामे करणारे विभाग असले तरी महापालिकेत मात्र तीन कायम आस्थापनेवरील अभियंते आहेत. त्यामुळेच महापालिकेने मागील १६ वर्षापासून २० अभियंत्यांना मानसेवीतत्वावर नियुक्त केले आहे. परंतू विविध निधीतील कामे लक्षात घेता, अभियंते आणि स्वच्छतेसाठी आरोग्य निरिक्षकांची संख्या तोकडी असल्याने प्रशासनाने कंपनी मार्फत कंत्राटी पद्धतीवर अभियंते आणि आरोग्य निरिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. यासाठी महासभेची मंजुरी घेण्यात आली. २२ स्थापत्य अभियंते तर विद्युत, ऑटोमोबाईल, संगणक अभियंते प्रत्येकी दोन, एक जिएसआय अभियंता तर २० आरोग्य निरिक्षक नियुक्त करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. दोन कंपन्यांनी निविदा दाखल केल्या. यापैकी एक नागपूर तर दुसरी अकोल्याच्या कंपनीचा समावेश होता. नागपूरच्या कंपनीची िनविदा अधिक दराने तर अकोल्याच्या कंपनीची निविदा कमी दराने होती. मात्र प्रशासनाने कमी दराची निविदा स्विकारता अधिक दराच्या कंपनीला अभियंते आणि आरोग्य निरिक्षक पुरविण्याचे आदेश दिले. दरम्यान कमी दर दाखल करणाऱ्या अकोल्याच्या कंपनीने यावर आक्षेप घेतला आहे. या अनुषंगाने स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याकडे तक्रार केली असून या तक्रारीवरून सभापती विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला पत्र देऊन कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती बोलावली आहे.

स्थायीसमिती सभापतींनी दिले पत्र : संबंधितकंपनीच्या तक्रारीवरुन स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी उपायुक्त प्रशासनाला पत्र दिले असून माहिती मागीतली आहे. या पत्रात म्हटले आहे की, सुनिल मुरुमकार यांनी कंत्राटी पद्धतीने अभियंता नियुक्तीत अनियमितता झाल्याची तक्रार केली आहे. त्यांनी उद्योग उर्जा विभागाचे राजपत्रही सादर केले आहे. त्यांची निविदा कमी दराची असताना ती नाकारुन आपण अधिक दराच्या निविदा धारकास काम दिले आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती सादर करावी.

कमी दराच्या निविदा
-किमानदरापेक्षाकमी दराच्या निविदा शासनाच्या नियमानुसार स्विकारता येत नाहीत. संबंधित कंपनीची निविदा कमी दराने असल्याने नियमानुसारच कार्यवाही केलेली आहे. यात कोणतीही अनियमितता नाही.
सुरेश सोळसे- उपायुक्त प्रशासन

कर्मचाऱ्यांना कामाचे आदेशही नाही
बांधकाम, पाणी पुरवठा, नगररचना आदी विभागात कंत्राटी पद्धतीवर अभियंते रुजु झाले आहेत. मागील आठ दिवसापासून ते कामही करीत आहेत. परंतु अद्यापही या अभियंत्यांना संबंधित कंपनीने कामाचे आदेश दिलेले नाहीत. कंत्राट मंजूर झालेल्या कंपनीने कर्मचारी पुरवले आहेत तर त्यांना संबंधित कंपनीकडून कामाचे आदेश अद्याप का दिल्या गेले नाहीत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारे कामाचे आदेश नसताना महत्वाची डाक्युमेन्ट या अभियंत्यांच्या हातात दिली जातात.

-माझी निविदाकमी दराची होती. म्हणणे ऐकुन घेता, दुसऱ्या कंपनीची निविदा मंजुर केली. माझ्यावर अन्याय झाला असून न्याय मिळण्यासाठी दाद मागु.
- अनिल मुरुमकार, तक्रारकर्ता

काम कुणाला, कर्मचारी कुणाचे?
नागपूरच्या कंपनीला कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट मिळाले. संबंधित कंपनीने नागपूर येथे अभियंत्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती घेतल्या नंतर नऊ अभियंत्यांच्या नावाची यादी महापालिकेला देऊन या अभियंत्यांना काम देण्याची विनंती केली. मात्र प्रत्यक्षात हे कर्मचारी रुजु होण्या करीता गेले असता, या कर्मचाऱ्यांना रुजु करुन घेतले नसल्याची माहिती मिळाली आहे. तर त्या ऐवजी दुसऱ्याच कंपनीने पाठवलेले कर्मचारी रुजु झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट नेमके कोणत्या कंपनीला मिळाले? अशी चर्चा महापालिकेत सुरु आहे.
बातम्या आणखी आहेत...