आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस पाहताहेत आयुक्तांच्या माहितीची वाट; मुलांचे मृत्यू प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रेनवाॅटरहार्वेस्टिंगसाठी तयार केलेल्या शाेषखड्ड्यातील पाण्यात बुडून दाेन चिमुकल्यांचा करुण अंत झाल्याप्रकरणी साेमवारी मनपा अायुक्त, अभियंता, कंत्राटदार स्वयंसेवी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी शुक्रवारी शनिवारी नगरसेवक, स्वयंसेवी संस्थांची चौकशी केली. तसेच आयुक्तांवर कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्याकडून दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती मागितली आहे. मात्र, बैठकांच्या नावावर आयुक्तांनी शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिसांना कोणतीही माहिती देऊन सहकार्य केले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

रविवारी आदर्श कॉलनीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक १६ मधील मैदानात सिद्धार्थ राजेश धनगावकर कृष्णा राकेश बहेल हे मृत्यूमुखी पडले हाेते. मैदानात मे महिन्यात रेन वाॅटर हार्वेस्टिंगसाठी शोषखड्डे तयार केले होते. हे खड्डे पूर्णपणे बुजवलेले नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यात साचले होते. सोमवारी याप्रकरणी पोलिसांनी मनपा अायुक्त, अभियंता, कंत्राटदार स्वयंसेवी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल गुन्हा केला होता. मात्र, पोलिसांनी आरोपींना थेट अटक केली नाही. चौकशीअंती आरोपींना अटक करणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींची चौकशी सुरू केली. शोषखड्ड्यांबाबत पोलिसांनी आरोपी असलेले आयुक्त यांना माहिती मागितली. मात्र, तीन दिवस उलटूनही आयुक्तांनी पोलिसांना माहिती दिली नाही.

मुख्याध्यापकांची चौकशी :
शाळेच्याआवारात शोषखड्डे आहेत. ते पाण्याने भरले आहेत. तेथे केव्हाही दुर्घटना होऊ शकते, असे तुमच्या मनात आले नाही काय, असे एक ना अनेक सवालांची सरबत्ती पोलिसांनी शनिवारी सायंकाळी मुख्याध्यापकांवर केली.
आरोपींना अटक का नाही, नागरिकांचा प्रश्न
आरोपी मोठे लोकं आहेत. म्हणून पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, सामान्य माणसांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास त्यांना तत्काळ अटक करण्यात येते. मग सामान्यांसाठी मोठ्या लोकांसाठी कायदा वेगळा आहे काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आरोपींवर काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
बातम्या आणखी आहेत...