आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबीयांचे सांत्वन, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची सांगळूद येथे भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बाळापूर तालुक्यातील मोरगाव सादिजन येथील आत्महत्या केलेले शेतकरी गणेश पांडुरंग वाघ ( वय ४० वर्षे) यांच्या कुंटुबियांची पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी १५ एप्रिलला त्यांच्या राहत्या घरी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 

यावेळी डॉ. पाटील यांनी मयत पावलेले गणेश वाघ यांचे आई-वडिल, पत्नी चार मुली यांच्याशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. त्यांना शासनाकडून तातडीने मदत देण्याचे आश्वासन देऊन डॉ. पाटील यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्याबरोबरच त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे सांगितले.यावेळी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, बाळापुरचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, प्रभारी तहसिलदार योगेश कवोटकर, गटविकास अधिकारी श्री. शिंदे, तलाठी शेफाली देशमुख उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...