आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक संकट, यावर्षी तुरीचे भाव देताहेत शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्ह्यात तूर काढणीला आली आहे. मात्र तूर घरात येण्याअगोदरच गतवर्षीच्या तुलनेत तुरीचे दर निम्म्याने कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरत आहे. त्यामुळे सततची नापिकी, दुष्काळ नोटा बंदीचे त्रासलेला शेतकरी आता तुरीचे भाव गडगडल्याने चिंतातूर झाला आहे.
गेल्यावर्षी शेतकऱ्याच्या तुरीला १० हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर होता. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचा तुरीकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात तुरीचे सरासरी ७८ हजार १४९ पेरणी क्षेत्र असून यावर्षी वाढ होऊन ८४ हजार ८४६ क्षेत्रात पेरणी झाली आहे. तर यावर्षी एकूण १०९ टक्के क्षेत्रात पिकाची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी सर्वाधिक वाढ लोणार तालुक्यात झाली असून येथे १५६ टक्के क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादन वाढणार आहे.
परंतु यंदा तुरीला ४२५० ते हजार रुपये क्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. गेल्यावर्षी तुरीला रेकॉर्डब्रेक असा दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. त्यामुळे दुष्काळात जगवलेल्या तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांना चांगले पैसे देऊन गेले. यावर्षीही तुरीला चांगला दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा कमी करीत तुरीचा पेरा दुपटीने वाढवला आहे. यावर्षी जळगाव जामोद तालुक्यात सरासरी क्षेत्र ३३१९ पेरणी क्षेत्र ४२३८ असून टक्केवारी १२८, संग्रामपूर तालुक्यात सरासरी क्षेत्र ३८८० पेरणी क्षेत्र ३६७६ असून टक्केवारी ९४.०७, चिखली तालुक्यात सरासरी क्षेत्र १०५५० पेरणी क्षेत्र १२२५७ असून टक्केवारी ११६, देऊळगाव राजा तालुक्यात सरासरी क्षेत्र ५०८८ पेरणी क्षेत्र ३५०० असून टक्केवारी ६८.८, मेहकर तालुक्यात सरासरी क्षेत्र ९५५१ पेरणी क्षेत्र ११५४५ असून टक्केवारी १२१, सिंदखेडराजा तालुक्यात सरासरी क्षेत्र ५०२२ पेरणी क्षेत्र ४८५५ असून टक्केवारी ९६.७, लोणार तालुक्यात सरासरी क्षेत्र ६११६ पेरणी क्षेत्र ९५४६ असून टक्केवारी १५६, खामगाव तालुक्यात सरासरी क्षेत्र ८५९५ पेरणी क्षेत्र १०८०० असून टक्केवारी १२६, शेगाव तालुक्यात सरासरी क्षेत्र ४५१४ पेरणी क्षेत्र ५००० असून टक्केवारी १११, मलकापूर तालुक्यात सरासरी क्षेत्र ५५८१ पेरणी क्षेत्र ५४२४ असून टक्केवारी ९७.२, मोताळा तालुक्यात सरासरी क्षेत्र ५८१४ पेरणी क्षेत्र ५२६६ असून टक्केवारी ९०.०६, नांदुरा तालुक्यात सरासरी क्षेत्र ५८७७ पेरणी क्षेत्र ६२६८ असून टक्केवारी १०७ क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी एकूण १०९ टक्के क्षेत्रात पेरणी करण्यात आल्याने उत्पादनातही वाढ झाली आहे. बाजारात आवक वाढल्याने तुरीचे भाव घसरल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी साडेसहा ते सात हजार प्रति क्विंटल असलेला भाव शेतकऱ्यांकडे नवीन तूर येताच चार ते पाच हजारांवर आला आहे. त्यामुळे शेतमालाच्या दराबाबत आता कुठलीच शाश्वती राहिलेली नाही.

शेतकऱ्यांसाठी नोटाबंदी संकट
नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना रोख मालाचे पैसे मिळणे अवघड आहे. शेतकऱ्याने शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला नेल्यावर जर रोख पैसे पाहिजे असल्यास जुन्या नोटा दिल्या जातात. तर व्यापारी शेतकऱ्यांना चेक देत अाहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विकलेल्या मालाचे पैसे मिळण्यास बँकेत हेलपाटे घ्यावे लागत आहेत.

कमी दरामुळे शेतकऱ्यांना फटका
- गेल्या वर्षीच्या तुलनेततुरीला मिळालेला १० ते ११ हजार रुपये प्रति क्विंटलचे दर यावर्षी ते हजार रुपये प्रति क्विंटलवर आले आहे. घसरण सुरू असून शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. तुरीला आलेले चांगले दिवस औटघटकेचे ठरले असून सध्या तुरीच्या भावात कमालीची घसरण झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. दुष्काळ, अतिवृष्टीचा तडाखा किडरोग यांसह इतर संकटातून तारलेल्या तुरीला समाधानकारक दर मिळत नसल्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरलेले दिसत आहे.
विजय शेळके, शेतकरी, मोताळा
बातम्या आणखी आहेत...