आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: सिटी कोतवालीपासून हाकेच्या अंतरावर तीन दुकानांमध्ये चोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोरट्यांनी याच दुकानात प्रवेश केला होता - Divya Marathi
चोरट्यांनी याच दुकानात प्रवेश केला होता
अकोला - चोरांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याची प्रचिती गुरुवारी आली. सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका दुकांनामध्ये चोरट्यांनी टीन कापून, तर दुसऱ्या दुकानात भिंत तोडून प्रवेश केला तर तिसऱ्या दुकानात चोरीचा प्रयत्न केला. या वेळी लाखो रुपयांचे साहित्य चोरून नेताना पोलिसांना घटनेची कानोकान खबर लागली नाही. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दुकानदारांनी गुरुवारी धाव घेतली होती. चोरीच्या घटनांमुळे व्यावसायिकांनी चोरट्यांची धास्ती घेतली आहे. 
 
सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी बुधवारच्या रात्री धुमाकूळ घातला. जुन्या कपडा बाजारातील तीन दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले. राजेश खेमचंद हेमनानी यांचे सोनी फॅशन आहे. त्यांच्या दुकानातील तिसऱ्या मजल्यावर टिनाचे गोडावून आहे.
 
चोरट्यांनी छटरच्या सहाय्याने टिन कापला दुकानात प्रवेश केला. त्यांनी दुकानातील संपूर्ण साहित्याची फेकाफेक केली कपडे चोरून नेले. त्यानंतर चोरट्यांनी राजेश इलेक्ट्रानिक्समध्ये शिरण्यासाठी छताची ग्रील तोडून भींत फोडली दुकानातील मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह २५ हजार रुपये चोरून नेले. या दुकानात चोरट्यांनी हात साफ केल्यानंतर कुटान्स नावाच्या कपड्याच्या दुकानात त्यांनी आपला मोर्चा वळवला येथे चोरीचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विना पंडे, पोलिस कॉन्स्टेबल विपुल सोळंके, शेख माजीद यांच्यासह डीबीस्कॉडचे कर्मचारी दुकानात पोहचले होते. यावेळी पोलिसांनी काही संशयितांची चौकशी सुरु केली होती. 
 
शहरातचाेरीच्या घटनांत वाढ : १५ दिवसांपूर्वी पहाटे रेल्वेस्थानक चौकात चोरट्यांनी कुरिअर्सचे सोने लुटले. पाच दिवसांपूर्वी तोष्णीवाल हाऊसमध्ये लाखोंचे दागदागिने लंपास करण्यात आले. तर आता सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुकाने फोडण्यात आली. यापैकी एकाही घटनेचा तपासात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकच पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, शॉकसर्किटच्या भीतीने सीसीटीव्ही नाहीत...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 

 
बातम्या आणखी आहेत...