आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंदखेडराजा: भाजपच्या नेतृत्वात शिवसेेनेचा सभापती होणार विराजमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा - धूलिवंदन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी १४ मार्च रोजी पंंचायत समिती सभापतीपदाची राजकीय धुळवड रंगणार असून भाजपच्या नेतृत्वात शिवसेनेच्या उमेदवाराची सभापतीपदी वर्णी लागणार असल्याचे चित्र आहे. 
 
पंचायत समितीमध्ये एकूण सदस्य संख्या १० आहे. सदस्य पदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे तर भाजप सेनेचे प्रत्येकी सदस्य निवडून आले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जरी सर्वात मोठा पक्ष असला तरी भाजप-सेनेने युती केल्यामुळे त्यांची एकूण सदस्य संख्या म्हणजेच बहुमत युतीचे होते अशी परिस्थिती आहे. पं. स. सभापतिपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. एकूण १० सदस्य पदाच्या संख्येत अनुसूचित जाती सदस्यांची संख्या दोन आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश श्रीपत ठोके हे २९९४ मते घेत सवडद या राखीव मतदार संघातून, तर शिवसेनेच्या लता अण्णा खरात या २२६३ मते घेत सोनुशी या अ.जा. महिला राखीव मतदार संघातून निवडून आल्या आहेत. म्हणजेच सभापती पदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे आहेत. तर भाजप जवळ उमेदवार नाही. जि. प. पं. स. निवडणुकीच्या निकालातून विधानसभा स्तरावर राष्ट्रवादीच्या यशातून एकमेव राजकीय नेता म्हणून डॉ. शिंगणे यांच्या नावावर जनतेने शिक्कामोर्तब केला असल्याचे वास्तव समोर आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र यावे लागले आहे. त्यामुळे सभापतिपदी शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठी भाजपचे युवा नेते विनोद वाघ यांच्या नेतृत्वात भाजप सेनेचे सहाही सदस्य सहलीवर रवाना झालेले आहेत. त्यामुळे १४ मार्च रोजी मंगळवारी पंचायत समिती सभापतीपदी सेनेच्या लता अण्णा खरात यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. जिल्हास्तरीय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी समीकरणे बदलून सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 
 
आगामी निवडणूक लक्षात घेऊन देणार पद 
अडीच वर्षानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जातीचे समीकरण लक्षात घेता पाटील समाजाच्या सदस्याला सभापतिपदी विराजमान करण्याची खेळी खेळली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
 
खामगाव - पंचायत समितीच्या सभापती उप सभापती पदाची नावे राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर ठरवणार आहेत. ज्या पंचायत समिती सदस्याच्या नावाला ते हिरवी झेंडी देतील तेच सभापती उप सभापती पदाच्या खुर्चीवर विराजमान होतील. तर रंगपंचमीच्या रंगात पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीला चांगलीच रंगत चढली आहे. 
 
पंचायत समितीच्या १४ जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे १० काँग्रेसचे सदस्य निवडून आले. तब्बल २५ वर्षानंतर या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला. भाजपचा झेंडा फडकवण्याची किमया ग्रामीण भागातील जनतेच्या आशीर्वादाने भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी केली. पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक १४ मार्च रोजी होत आहे. या दृष्टीने इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डींग लावली आहे. यामध्ये कोण बाजी मारतो हे १४ मार्चला स्पष्ट होणार आहे. सभापती पदाच्या शर्यतीत उर्मिला शरदचंद्र गायकी, विलास काळे तुषार गावंडे हे तिघे आहेत. त्यांच्या नावाची चर्चा पण राजकीय वर्तुळात आहे. मात्र यापैकी कोणाच्या नावाची वर्णी लागते, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. कृषी मंत्री फुंडकर हेच सभापतिपदाचे उमेदवार ठरवणार असल्याने ते कोणत्या सदस्याला पसंती देतात यावरून सभापती पदाची दावेदारी ठरणार आहे. सभापती पदाची निवडणूक रंगपंचमीदरम्यान आल्याने या निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे. दरम्यान, सभापती पदाच्या निवडणुकीकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 
बातम्या आणखी आहेत...