आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२९ दिवस शांतता अन् एकाच दिवसात ५३ पोलिस कारवाया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पोलिस रेकॉर्डनुसार क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५३ वाहनांवर महिन्यातील एकाच दिवशी कारवाई करण्यात आली, तर उर्वरित दिवसांमध्ये एकाही वाहनांवर कारवाई केली नाही. त्यामुळे २९ दिवसांमध्ये अवैध वाहतूक झालीच नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासोबतच नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलिस ठाण्यांकडून काढून घेऊन ते वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण पोलिस ठाणे त्याला अपवाद आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पोलिस रेकॉर्डनुसार मोटार वाहन कायद्यान्वये कारवाईची आकडेवारी थक्क करणारी आहे. महिनाभरात शहरातील केवळ अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या २९ खासगी वाहनांवर कारवाई केली. त्यात १५ दिवस एकही कारवाई झाली नाही.

तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहून नेणाऱ्या ५३ वाहनांवर पोलिस कारवाईची नोंद आहे. विशेष म्हणजे ही कारवाई एकाच दिवशी करण्यात आली आहे. कलम १०८,१७७ मोटार वाहन कायदा प्रखर हेड लाईट असलेल्या वाहनांवर कारवाया केल्या आहेत. तर फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या १९४ वाहनावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे ड्रंकन ड्राईव्हच्या झिरो कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. म्हणजेच जिल्ह्यात दारू पिऊन एकही वाहनचालक पोलिसांना सापडला नाही.

वाहनधारकम्हणतात, हप्त्याशिवाय कसे जमेल : जिल्ह्यातअवैध वाहतुकीच्या आकड्यांवरून जिल्ह्यात अवैध वाहतूक होत नाही, असे दिसते. मात्र प्रत्यक्षात वाहनधारकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता विना हप्ता गाडी रोडवर चालवूच शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काळी पिवळी, ग्रामीण भागात चालणारी टाटा मॅजिकसारखी पांढरी वाहने, शहरातून धावणारी खासगी बसेस (विशेषत: अकोट बाळापूर, कारंजारोडवर) यांचे त्या त्या हद्दीतील पोलिसांशी लागेबांधे आहेत. त्यांच्या आशीर्वादाने ही वाहतूक सर्रास सुरु आहे. अशी वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीतून सुरु आहे, की त्यांच्या राजा उदार झाला या म्हणीनुसार सुरु आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
अकोला शहरावर पोलिस प्रशासनाचा फोकस असतानाही अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून येते. तुलनेत ग्रामीण भागात अवैध वाहतुकीच्या मोजक्याच कारवाया आहेत. जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यांनी तर महिनाभरात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईचे खातेही उघडले नाही. कारवाई होणे याचा एक अर्थ म्हणजे वाहतुकीचे नियम अकोलेकर पाळत आहेत. तर त्याचा दुसरा अर्थ म्हणजे पोलिस हप्ते घेत असल्यामुळे कारवाया होत नाही, असा तर होत नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.
ऑगस्ट महिन्यातील कारवाया अशा (पोलिस रेकॉर्डवरून)
-अवैध प्रवाशी वाहतूक खासगी वाहन - २९ (शहर)
-अवैधप्रवाशी वाहतूक खासगी- १८७ (अकोलाग्रामीण)
-क्षमतेपेक्षाअधिक प्रवाशी वाहतूक - ५३
-कागदपत्र बाळगणे -१२३२
-प्रखर हेडलाईट- ०३
-प्रखर हेडलाईट फॅन्सी नंबर प्लेट- १९४
-ड्रंकन ड्राईव्ह- ००
बातम्या आणखी आहेत...