आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमबाह्य हस्तांतरण, खरेदी सव्वा दाेन कोटींची; दंड मात्र, दोन कोटी तीन लाखांचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शासनाची पूर्व परवानगी घेता जमिनीचे नियमबाह्य हस्तांतरण करणे पूर्व परवानगी शिवाय व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी जठार पेठेतील शिकवणी संचालक अजय दिनकर देशपांडे राजेश विष्णुपंत जोध यांना दोन कोटी लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश अग्रवाल यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे खरेदी व्यवहार दोन कोटी २५ लाखांचा आणि दंड दोन कोटी लाख रुपये देण्यात आला आहे. आता असे व्यवहार
झालेले ५०० प्रकरणे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या रडारवर आहेत.

शहरात सत्ता प्रकरणात अनेक जमिनीचे पट्टे देण्यात आले आहेत. मात्र त्यांचे परस्पर खरेदी व्यवहार करुन नोंदीही करण्यात आल्या आहेत. शहरात नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश अग्रवाल यांनी अशा प्रकरणांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी उपनिबंधक कार्यालयात नोंदीसाठी आलेल्या खरेदी खतांची माहिती मागितली असून अशी प्रकरणी आपल्याकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जठार पेठेतील शिकवणी
वर्ग संचालक अजय दिनकर देशपांडे राजेश विष्णुपंत जोध यांच्या प्रकरणात उपविभागीय अधिकारी यांनी दंडाचे आदेश दिले आहेत. देशपांडे जोध यांनी ४७०७ चौरस फुट जमीन विनापरवाना श्रीनिवास श्रीकृष्ण उटगीकर सौ. राची श्रीनिवास उटगीकर यांच्याकडून हस्तांतरण केले. हा सर्व व्यवहार पूर्वपरवानगी घेता झाल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी सत्ताप्रकारातील सदर मिळकती मध्ये झालेले विना परवानगी हस्तांतरण नियमबाह्य असल्याने
शासन निर्णय २३ डिसेंबर २०१५ नुसार पूर्वपरवानगी शिवाय झालेला शर्त भंग प्रचलित बाजार मुल्यानुसार ४० टक्के अनर्जीत रक्कम पूर्वपरवानगीशिवाय व्यावसायिक वापर करण्यात येत असल्याने प्रचलित बाजार मुल्यांच्या ५० टक्के अनर्जीत रक्कमेचा शासकीय महसुलाचा भरणा करणे आवश्यक आहे. हा व्यवहार करताना गैरअर्जदार यांनी शासनाची पूर्वपरवानगी घेवून १० टक्के रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे करता परस्पर खरेदीखत करून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी नोंद करण्यासाठी उपअधीक्षक भुमी अभिलेख
कार्यालयात खरेदीखत इतर कागदपत्रे सादर केल्यामुळे हे प्रकरण उपविभागीय कार्यालयाने दाखल करून घेतले होते.
असाझाले जमिनीचे हस्तांतरण : नझुलशीट क्र. ७५ डी, प्लॉट नं मध्ये एकूण क्षेत्र २८९५.२ असून सदरची मालमत्ता सत्ता प्रकरणारची आहे. तिचा मूळ मालक माधव गोपाल सिरसाळकर हे असून सहधारक श्रीनिवास श्रीकृष्ण उटगीकर राची श्रीनिवास उटगीकर आहेत. त्यांचे नावे २५६३० चौरस फूट क्षेत्र असल्याचे अभिलेखाचे हक्क नोंदणी मिळकत पत्रावरून दिसून येते. सध्या देशपांडे जोध यांनी ९४२० फुटावर सिमेंटचे बांधकाम केले आहे. तसेच टीन शेड शिकवणी वर्गाच्या माध्यमातून व्यावसायिक वापर सुरु केला आहे. या प्रकरणामध्ये माधव
गोपाळ सिरसाळकर यांनी श्रीनिवास उटगीकर राची उटगीकर यांना विना परवानगी विक्री करून शर्त भंग झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच राजेश जोध देशपांडे यांनी १६ फेब्रुवारी २०१६ रोजी खरेदी खतान्वये खरेदी केले असून ही बाब सत्ता प्रकारातील असून हस्तांतरण किंवा खरेदी करताना पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचा आदेशात ठपका ठेवला आहे. झालेला शर्त भंग नियमित करण्यासाठी बाजार मुल्यांच्या ४० टक्के शिकवणी वर्गाच्या माध्यमातून व्यावसायिक वापराबाबत बाजारमूल्याच्या ५० टक्के अनर्जीत रक्कम कोटी एक
लाख ७६ हजार ९७५ हजार रुपयाचा भरणा शासनाच्या खजिन्यात जमा करण्याचे आदेश अग्रवाल यांनी दिले आहेत.
कोट्यवधींचा महसूल जमा होणार
-शहरात अनेकभागात सत्ताप्रकारातील जमीनही आहेत. त्यांचे अनेक व्यवहार विनापरवानगी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहेत. अशी जवळपास ५०० प्रकरणे आहेत. या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहचल्यास शासनाला दंडाच्या रकमेपोटी कोट्यवधींचा महसूल प्राप्त होऊ शकतो
-ओमप्रकाश अग्रवाल, उपविभागीय अधिकारी
बातम्या आणखी आहेत...