आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ट्रान्सफार्म महाराष्ट्र’मध्ये बुलडाण्याचा विद्यार्थी राज्यातून चवथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिद्द,चिकाटी, कठोर परिश्रम या त्रि सुत्रीच्या जोरावर बुलडाण्याचा विद्यार्थी सध्या नांदेड येथील श्री गुरूगोविंदसिंगजी अभियांत्रीकी महाविद्यालयात बी.टेक व्दितीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या सागर रुपराव उज्जैनकर या विद्यार्थ्याने ‘ट्रान्सफार्म महाराष्ट्र’मध्ये ‘ग्रामीण शैक्षणिक सुधारणा’ हा आॅनलाइन प्रोजेक्ट सादर केला होता. त्याच्या प्रोजेक्टचा नांदेड विद्यापिठातून प्रथम तर महाराष्ट्रातून चवथा क्रमांक आला आहे. या यशाबद्दल त्याचा येत्या मे महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. इतर विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श डोळयासमोर ठेवून यशाची शिखरे पादाक्रांत करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शहरातील सामान्य कुटूंबातील सागर उज्जैनकर याचे दहावी पर्यतचे शिक्षण भारत विद्यालय तर बारावीचे शिक्षण श्री शिवाजी विद्यालयात पूर्ण झाले. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होताच त्याने एनडीएची परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण सुध्दा झाला होता. परंतु वय कमी पडल्यामुळे त्याची निवड करण्यात आली नाही. लहाणपणापासूनच मशिनरीची आवड असल्याने त्याने नांदेड येथील श्री गुरूगोविंदसिंगजी अभियांत्रीकी महाविद्यालयात बी. टेकला प्रवेश घेतला. यंदा व्दितीय वर्षात असताना त्याने ट्रान्सफार्म महाराष्ट्रमध्ये ग्रामीण शैक्षणिक सुधारणा हा ऑनलाईन प्रोजेक्ट सादर केला. त्यामध्ये त्याने पब्लीक इंटरशिप स्किम, ऑनलाईन इनोव्हेशन पोर्टर स्कुल अॅडव्हान्स प्रोग्रामचा समावेश केला आहे. त्याच्या या प्रोजेक्टचा नांदेड विद्यापिठातून प्रथम तर महाराष्ट्रातून चवथा क्रमांक आला आहे. या यशाबद्दल त्याचा येत्या मे महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आई बाबा संगीता रुपराव उज्जैनकर यांना दिले आहे. 

बुलडाणा शहराचा मागील काही दिवसामध्ये शैक्षणिकदृष्ट्या मोठा विकास होत आहे. येथील विद्यार्थी अनेक विषयामध्ये यश मिळवत असल्याचे सागरच्या यशातून दिसून आले आहे.
 
मॅकेनिकल इंजिनिअर होवून देशाचे नाव उंचावेल 
- सतत अभ्यास कठोर परिश्रम केल्यामुळेच हे यश मिळाले आहे. इतर विद्यार्थ्यांनी सुध्दा अभ्यास करून यशाचे शिखर गाठावे. भविष्यात मोठा मॅकेनिकल इंजिनिअर होवून आई बाबाचे स्वप्न पुर्ण करून देशाचे नाव उंचावणार आहे. इतरांनीही तसा प्रयत्न करावा.
सागर उज्जैनकर, विद्यार्थी बि. टेक.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...