आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: टायर फुटल्याने दुचाकीवरून पडला, ट्रकने जीव घेतला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहकर - गावाकडेजात असतांना दुचाकीचे टायर फुटल्याने रस्त्यावर पडलेल्या एकास ट्रकने चिरडल्याने एक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना आज सोमवार, १० एप्रिल रोजी मेहकर ते चिखली दरम्यान नागझरीजवळ घडली. 
 
मेहकरवरून आपल्या एम. एच २८ एएम ४१७९ ने गावाकडे टिबलसीट जात असताना नागझरी जवळ दुचाकीचे समोरील टायर फुटले मागे बसलेल्या मित्राने अचानक धावत्या दुचाकीवरून उडी मारल्याने गाडीचे संतुलन बिघडले. त्यामुळे विनोद तांदुळे वय २३ हा दुचाकीसह रस्त्यावर पडला. याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या एमएच २० डीई ३९४६ क्रमांकाच्या ट्रकने त्याला चिरडले. तर यावेळी त्याचा मित्र रवि राऊत हा रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडलेला होता. त्या दोघांना उपचारासाठी मेहकरच्या मल्टी हॉस्पिटलमध्ये भरती केले असता विनोद तांदुळे याचा उपचाराआधीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर रवि राऊत याचेवर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपी ट्रकचालकास अटक केली आहे. मृतक विनोद हा मूळचा लव्हाळाजवळील आमखेड येथील रहिवासी असून आई वडिलांना एकुलता होता. तो हिवरा आश्रम येथे हेअर सलूनचे दुकान चालवित होता. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...