आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळेेे भिजलेले तुरीचे पोते अखेर वेअर हाऊसमध्ये रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली - पावसात भिजल्याने शेकडो क्विंटल तुरीला फुटले कोंब, या मथळ्याखाली दैनिक दिव्य मराठीने १२ जूनच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे बाजार समिती प्रशासनासह नाफेडच्या कर्मचाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आज १४ जून रोजी सदर तुरीच्या पोत्याची वेअर हाऊस मध्ये रवानगी करण्यात आली आहे. तुरीच्या पोत्याची वाहतुक करण्यासाठी नाफेडच्या वतीने तीन ट्रक लावण्यात आले आहेत. 
 
पावसाळा सुरू होण्यापुर्वी शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी करण्यात यावी. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तूर ओली होणार नाही याची नाफेडने खबरदारी घ्यावी, या मागणीसाठी गेल्या महिन्यात अनेक पक्ष संघटनांनी आंदोलने केली. परंतु तरी सुध्दा नाफेडने यातून कुठलाच धडा घेतला नाही. शेतकरी तसेच व्यापाऱ्यांकडून विकत घेतलेली तूर नाफेडच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र यापैकी वीस हजार तुरीचे कट्टे बाजार समितीच्या यार्डमध्येच पडून होते. पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात ही तुरीचे पोते ओली झाली. त्यानंतरही तुरीचे पोते हलवण्याची तसदी नाफेडच्या व्यवस्थापणाने घेतली नाही. परिणामी तूर पोत्यातच उगवली होती. काही तुरीच्या पोत्यांना अक्षरशा कांेब फुटले होते. तर अनेक पोत्यांना बुरशी लागल्याने त्यातील तूर खराब झाली होती. वास्तविक पाहता मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज पाहून यार्डमधील पोत्यांना गोडाऊन मध्ये हलविणे किंवा ती ओली होऊन नये म्हणून किमान त्याच्यावर ताडपत्री टाकणे आवश्यक होते. परंतु नाफेडच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून साधी ताडपत्री टाकण्याची तसदी घेण्यात आली नव्हती. या बाबत दैनिक दिव्य मराठीने १२ जूनच्या अंकात पावसात भिजल्याने शेकडो क्विंटल तुरीला फुटले कोंब, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची नाफेडचे अधिकारी शिंगणे यांनी तातडीने दखल घेवून पावसामुळे भिजलेले तुरीचे पोते वेअर हाऊसमध्ये टाकण्यास सुरूवात केली आहे. तुरीची वाहतुक करण्यासाठी नाफेड प्रशासनाने तीन ट्रक लावण्यात आले आहेत. 

तर शासनाचे नुकसान झाले नसते 
^चिखली येथील बाजार समितीच्या यार्ड मध्ये वीस हजार तुरीचे कट्टे पडून होते. यातील बहुतांश कट्टे पावसामुळे भिजले आहेत. पावसाळा सुरू होण्यापुर्वीच नाफेडने सदर तुरीचे पोते वेअर हाऊसमध्ये ठेवले असते तर शासनाचे नुकसान झाले नसते. या नुकसानीस जबाबदार धरून संबंधितावर कारवाई करण्यात यावी. विनायकसरनाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटना 
बातम्या आणखी आहेत...