आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उजाला’ योजनेने घराघरात पाडला स्वस्त दरात ‘प्रकाश’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - विजेची बचत होवून ग्राहकांची अधिकच्या बिलातून सुटका व्हावी, कमी वॅटमध्ये जास्त प्रकाश पडावा, वीज बिलातून ग्राहकाच्या पैशाची बचत व्हावी, या विकासाभिमुख उद्देशाने केंद्र शासनाने मागील वर्षांपासून उजाला योजना सुरू केली आहे.
 
या योजनेतंर्गत अत्यंत वाजवी दरात सहा वॅट नऊ वॅटचे बल्बची विक्री सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षी साडे आठ लाख तर मागील फेब्रुवारी महिन्यापासून ते आतापर्यंत साडे पाच हजार बल्बची विक्री करण्यात आली आहे. नऊ वॅटच्या बल्ब मधून साठ वॅटचा प्रकाश पडून जवळपास चाळीस ते पन्नास टक्के वीजेची बचत होतआहे. त्यामुळे सदर बल्ब खरेदी करण्यासाठी नागरिक एकच गर्दी करीत आहेत. 
 
मागील काही दिवसापासून उन्हाळयाची चाहुल लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीजेचा वापर वाढला आहे. आजही असंख्य ग्राहकांच्या घरात विविध कंपन्याचे बल्ब फॅन आहेत. परंतु या बल्ब फॅनच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर वीज खर्च होत आहे. परिणामी ग्राहकांना अपेक्षेपेक्षा जास्त बिले येत आहेत. हे बिल भरू शकल्यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांचा वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे वीजेसोबतच ग्राहकाच्या पैशाची बचत व्हावी, यासाठी केंद्र शासनाने मागील वर्षापासून उजाला योजना सुरू केली आहे. या योजनेतंग्रत वीज ग्राहकांना अत्यंत माफक दरात सहा नऊ वॅटच्या बल्बची विक्री करण्यात येत आहे. मागील वर्षी बुलडाणा खामगाव शहरात विक्री केंद्रे सुरू केली होती. त्यावेळी लाख ५४ हजार ३३८ बल्बची विक्री करण्यात आली होती. तर फेब्रुवारी महिन्यापासून येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या विक्रीकेंद्रातून नऊ वॅटचा बल्ब केवळ ६५ रुपयात विक्री करण्यात येत आहे. तर बाजारात या बल्बची किंमत दीडशे ते दाेनशे रुपये आहे. या नऊ वॅटच्या बल्ब मधून साठ वॅट इतका प्रकाश मिळत असून चाळीस ते पन्नास टक्के वीजेची सुध्दा बचत होत आहे. त्यामुळे असंख्य ग्राहक बल्ब खरेदी करण्यासाठी केंद्रात धाव घेत आहेत. मागील एका महिन्यात जवळपास साडे पाच हजार बल्बची विक्री करण्यात आली आहे. या बल्ब मुळे वीजेमध्ये कपात होवून ग्राहकांना कमी बिल येत आहे. 

लाखो बल्बची आजपर्यंत विक्री 
^मागीलवर्षीपासून केंद्र शासनाच्या वतीने उजाला योजना सुरू केली आहे.आता पर्यत लाखो बल्बची विक्री झाली आहे. या बल्बमुळे वीजे सोबत पैशाची बचत होते. सोपानसहाने, विभागीय व्यवस्थापक 

फॅन एलईडी ट्यूब विक्रीसाठी येणार 
येत्या काही दिवसातच फिलीप्स कंपनीचे फॅन एलईडी ट्यूब येणार आहेत. त्यापैकी एका फॅनची किंमत ११५० रुपये तर ट्यूबची किंमत २३० रुपये राहणार आहे. बल्ब, ट्युब फॅनची विक्री वर्षेभर सुरू राहिल. 
 
 
बातम्या आणखी आहेत...