आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळ्या विदर्भाचा निषेध, शिवसैनिकांवर लाठीमार, पाेलिसांची दादागिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी अकाेल्यात झालेल्या परिषदेत निषेध नाेंदवण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांवर पाेलिसांनी लाठीमार केला. बुधवारी झालेल्या या घटनेत उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, महानगरप्रमुख तरुण बगेरे यांच्यासह काही शिवसैनिक जखमी झाले. तर पाेलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

शहरातील प्रमिलाताई ओक सभागृहात राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी परिषदेचे आयोजन केले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास या परिषदेचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, महानगरप्रमुख तरुण बगेरे, तालुकाप्रमुख मुकेश मुरुमकार यांच्यासह काही शिवसैनिक सभास्थळी पोहोचले. मात्र कार्यकर्ते अाल्याचे पाहताच पाेलिसांनी अाक्रमक भूमिका घेतली. काेणतीही चाैकशी न करता पाेलिसांनी शिवसैनिकांवर लाठीमार सुरू केला. याबाबत माहिती कळताच जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर व आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच लाठीमार केल्याबद्दल पोलिसांना धारेवर धरले. दरम्यान, पाेलिसांशी हुज्जत घालणारे उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, महानगरप्रमुख तरुण बगेेरे, तालुकाप्रमुख मुकेश मुरुमकार, नगरसेवक शरद तुरकर, उपशहरप्रमुख मुन्ना मिश्रा यांच्यासह कार्यकर्त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.
आमदाराची मध्यस्थी : शिवसैनिकांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी पोलिसांना जाब विचारला. कायदेशीर मार्गाने निषेध नोंदवणे प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना मारहाण कोणत्या कारणावरून केली, असा जाब त्यांनी विचारला.

ही तर पाेलिसांची दादागिरी
प्रमिलाताई ओक हॉल येथे आम्ही वेगळ्या विदर्भ परिषदेचा निषेध नोंदवण्यासाठी आलो होतो. मात्र, उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी काहीएक बोलण्यापूर्वीच आमच्यावर लाठीमार केला. या अत्याचाराचा अाम्ही निषेध करताे, अशी प्रतिक्रिया महानगरप्रमुख तरुण बगेरे व जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी दिली.
महाराष्ट्र दिनी विदर्भात घराघरावर काळे झेंडे फडकावणार
‘माझा विदर्भ लढा सर्वांसाठी खुला आहे. मी कोणाच्याही मंचावरून बोलेन. मात्र, विदर्भवादी सर्व संघटनांनी सामूहिक लढा उभारावा, असा माझा प्रयत्न असेल. मात्र, काेणी अाले नाही तरी हा लढा थांबणार नाही’, अशी भूमिका राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी बुधवारी अकोल्यात मांडली. तसेच स्वतंत्र विदर्भासाठी २९ एप्रिल राेजी नागपुरात बैठक घेण्याची घाेषणाही केली. पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य अखंड राहावे, असा ठराव आणण्याची सत्ताधाऱ्यांची तयारी आहे. या पार्श्वभूमीवर िवदर्भातील सर्व ६२ आमदारांना बोलते करुन त्यांची कटिबद्धता तपासून पाहता येईल. शिवाय त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी सर्वांशी भेटून िवदर्भाचे स्वतंत्र राज्य कसे फायद्याचे आहे, हेही त्यांना पटवून देऊ, असे अणेंनी सांगितले.