आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालयामध्ये सरपंचापासून बीडीओपर्यंत 6 जणांनी केली घाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पंतप्रधान ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत हगणदारीमुक्त गाव योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे देयके काढण्यासाठी सरपंच पुत्रापासून ते गटविकास अधिकारी (बीडीओ) अशा सहा जणांनी मिळून लाभार्थ्यांकडे १४ हजार ९०० रुपये कमिशनची मागणी केली. कमिशन देण्याची ऐपत नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लाभार्थ्यांने तक्रार केली. त्यात मंगळवारी विस्तार अधिकाऱ्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या युनिटने पंचायत समितीमध्ये सापळा रचून रंगेहात अटक केली. 
 
अकोला पंचायत समिती बीडीओ जी. के. वेले, विस्तार अधिकारी आर. के. देशमुख, सहायक बीडीओ एस.एम. पंडे, समुह समन्वयक प्रशांत मधुकर ताले स्वप्नील गोपाळराव बदरखे आणि निभोंरा येथील सरपंच पुष्पाताई सुभाषराव ताथोडचा मुलगा नितीन याने सामुहिकपणे हिंगणा तामसवाडी येथील शौचालयाचे देयक काढण्यासाठी १४ हजार ९०० रुपयांची मागणी केली. जोपर्यंत प्रत्येकाला कमिशन मिळत नाही तोपर्यंत देयक काढणार नाही, अशी तंबी या लाचखोरांनी तक्रारदाराला दिली होती. मात्र रक्कम देण्याची ऐपत नसल्याने वर्षभरापासून शौचालयाची देयके रखडली होती. अखेर तक्रारदार गजानन सिरसाट यांनी वरिष्ठांपर्यंत तक्रार करूनही न्याय मिळाल्याने एसीबीचा दरवाजा ठोठावला. एसीबीने तक्रार घेऊन पडताळणी केली. त्यात सरपंच पुत्र नितीन ते बीडीओ असा सर्व सहाही जणांनी पैशाची मागणी केल्याचे आढळून आले. त्यात विस्तार अधिकारी आर.के. देशमुख याला दोन हजाार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तर एसीबीच्या युनिटने बीडीओ वेले, प्रशांत टाले, स्वप्नील बदरखे याला ताब्यात घेतले. तर दोघांचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधिक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. 
 
तत्कालिन जिल्हाधिकारी झाले होते गरम : तक्रारदार म्हणतो की, हा प्रकार सर्वप्रथम बीडीओंना सांगितला. त्यांनी दिल्या-घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नाही असे म्हटले, नंतर मी तत्कालिन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे गेलो. त्यांनीही माझ्यावरच प्रश्नांची सरबत्ती करत परत पाठवले. मी प्रामाणिकपणे काम केले. परदरचे पैसे मोडले आता यांना कमिशन कसे देऊ म्हणून एसीबीचा रस्ता धरला. माझ्यावर आत्महत्येचीच वेळ होती. 
 
तक्रारसरंपच मुलाकडे गेली कशी ? : तक्रारदाराने सरपंचाविरोधात पंचायत समितीमध्ये तक्रार दिली. कारवाई करतो म्हणून त्यास सांगितले तीच तक्रार सरंपचाच्या मुलाच्या व्हॉट्सअपवर गेली. त्यामुळे गावातच त्यांच्यात भांडणे लागली. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, काेणी किती मागितली लाच... 
बातम्या आणखी आहेत...