आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक मतदारांना अद्याप वोटर स्लिप मिळाल्या नाहीत, हजारो मतदारांसमोर निर्माण झाला प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
अकोला - महापालिकेच्या वतीने मतदानाच्या टक्केवारीत अधिक वाढ व्हावी, या हेतुने मतदारांना वोटर स्लिप दिल्या जात आहे. वोटर स्लिप देण्याचे काम शिक्षक तसेच राजकीय पक्षांचे उमेदवार करीत आहेत. मात्र नवीन प्रभाग रचनेमुळे हजारो मतदारांपर्यंत या वोटर स्लिप पोचल्याच नसल्याने आपले मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे? असा प्रश्न मतदारांसमोर उपस्थित झाला आहे. 
 
यावेळी एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. या अनुषंगाने प्रभाग रचना करण्यात आली. किमान १७ हजार ते २९ हजार मतदार प्रभागात आहे. मतदानासाठी ५८७ मतदान केंद्र निश्चित केली आहेत. मात्र प्रभाग रचना बदल्याने मतदान केंद्रातही बदल झाला आहे. २०१२ किंवा २०१४ च्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मतदान केले, त्याच मतदान केंद्रावर मतदारांची नावे असतीलच असे नाही. त्याचप्रमाणे काही मतदारांचे वास्तव्य दुसऱ्याच प्रभागामध्ये आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेलेे प्रभागातील उमेदवार अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या अनुषंगानेच महापालिकेच्या वतीने मतदारांपर्यंत वोटर स्लिप वाटपाचे काम सुरु करण्यात आले. मात्र दिवसभरात एक शिक्षक किती मतदारांपर्यंत पोचणार? अशी अडचणही निर्माण झाली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून वोटर स्लिप तयार करण्यात आल्या असल्या तरी या वोटर स्लिप अद्याप मतदारापर्यंत पोचलेल्या नाहीत. तसेच राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांच्या वोटर स्लिपही मतदारांपर्यंत पोचलेल्या नाहीत. त्यामुळे आपले मतदान कोणत्या मतदान केंद्रावर असा प्रश्न मतदारांसमोर आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, निवास वेगळ्या प्रभागात आणि मतदान वेगळ्या प्रभागात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...