आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच पालिकांसाठी ६६.४८ टक्के मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यातील नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी मतदानाची प्रक्रिया किरकाेळ अपवाद वगळता रविवारी शांततेत पडली. जिल्हयात सरासरी ६६.४८ टक्के मतदान झाले. जिल्हयात एकूण एक लाख ८१ हजार ५२६ पैकी एक लाख २० हजार ६७१ मतदारांची मतदानाचा हक्क बजावला. एकूण ११९ लाेकप्रतिनिधींचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले अाहे. साेमवारी सकाळपासून मतमाेजणीला प्रारंभ हाेणार अाहे. सायंकाळपर्यंत सर्वच ठिकाणचे निकाल घाेषित हाेण्याची शक्यता अाहे.
जिल्ह्यातील पाच नगराध्यक्षांसह नगरपरिषदांच्या ११८ लोकप्रतिनिधींसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळात ईव्हीएममध्ये हे मतदान नाेंदवण्यात अाले. जिल्हयात सकाळी थंडीमुळे नंतर नागरिक माेठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडले. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या हाेत्या. अनेक ठिकाणी मतदारांना नाव शाेधून देण्यासाठी सामाजिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.
जिल्हयात पाच नगराध्यक्षांसाठी ३९ उमेदवार मैदानात हाेत. मूर्तिजापूर, पातूर आणि तेल्हारा या तीन ठिकाणचे पद महिलांसाठी राखीव अाहेत. ११३ नगरसेवकांसाठी ५१७ उमेदवार मैदानात हाेते. सर्वाधिक ३३ नगरसेवक निवडून द्यावयाच्या अकोट नगरपरिषदेची संख्या १५४ वर स्थिरावली हाेती. बाळापूर आणि मूर्तिजापूर नगरपरिषदेची श्रेणी अकोट प्रमाणेच ‘ब’ आहे. याठिकाणी प्रत्येकी २३ नगरसेवकांची निवड करावयाची असून, त्यासाठी अनुक्रमे ८९ आणि १३१ उमेदवार रिंगणात हाेते. पातूर तेल्हारा या ‘क’ वर्ग नगरपािलकेसाठी प्रत्येकी १७ नगरसेवकांसाठी नागरिकांनी मतदान केले.

नगराध्यक्षासाठी सर्वाधिक १० उमेदवारांसाठी अकाेटात मतदान झाले. त्याखालोखाल प्रत्येकी उमेदवार बाळापूर पातूरमध्ये रिंगणात हाेते. तेल्हाऱ्यातील सात महिलांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली. मूर्तिजापूर येथे ही संख्या सर्वात कमी सहा हाेती. अकोट, बाळापूर वगळता इतर तीन नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. त्यातही पातूर नगरपरिषदेत अनुसूचित जातीच्या महिलेलाच उभे राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

जिल्हयातएकूण लाख २० हजार ६७१ मतदारांनी केले मतदान :जिल्ह्यात एकूण लाख ८१ हजार ५२६ पैकी लाख २० हजार ६७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवला. जिल्हयात एकूण ९५ हजार ३७ पुरुष मतदारांपैकी ६६ हजार ५६ मतदारांनी मतदान केले. जिल्हयात ८६ हजार ४८९ महिला मतदारांपैकी ५४ हजार ६१५ मतदारांनी मतदान केले. बाळापूरमध्ये एकूण ३५ हजार ९४० मतदारांपैकी २५ हजार २०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अाकाेटमध्ये ७१ हजार ५३५ पैकी ४५ हजार ७७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मूिर्तजापूर येथे एकूण ३८हजार ७०१ मतदारांपैकी २४ हजार ८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पातूर येथे एकूण २० हजार ११५ पैकी १३ हजार ८४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेल्हारा येथे एकूण १५ हजार २३५ मतदारांपैकी ११ हजार ७६५ मतदारांनी मतदान केले.

तेल्हारामध्ये झाले सर्वाधिक मतदान : तेल्हारामध्येसर्वाधिक ७७.२२ टक्के मतदान झाले. अाकाेट-६३.९९ टक्के, मूिर्तजापूर- ६२.२२, पातूर-६८.८१ अािण बाळापूर येथे ७०.१३ टक्के मतदान झाले.

पालिकानिहाय बूथची संख्या:
जिल्हयात नगराध्यक्ष, नगरसेवक निवडणूक प्रक्रियेत नगराध्यक्ष इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे ६०९ बॅलेट युनीट (बीयु) आणि २९३ कंट्रोल युनीट (सीयु) वापरण्यात अाले. जिल्ह्यात एकूण २४५ बुथवर मतदानाची व्यवस्था हाेती. हे बूथ १८ महसूल मंडळांमध्ये विभाजित करण्यात अाले. शनिवारी सध्याकाळीच अधिकारी-कर्मचारी नेमून िदलेल्या िठकाणी पाेहाेचले हाेते. रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस दलाच्या लेखी संवेदनशील असलेल्या पालिका क्षेत्राची पाहणी केली.

अशा हाेत्या मशिन्स
पोलिसांनी केली हाेती नाकाबंदी

नगराध्यक्ष,नगरपालिका प्रभागाच्या मतदानाच्या पृष्ठभूमीवर जिल्हयात नाकाबंदीला प्रारंभ झाला. अनेक ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात अाले हाेते. मतदानाच्या दिवशी सेक्टर झाेन पेट्राेलिंग व्हिडीअाेग्राफीही करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...