आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगावात गहू उत्पादक मळणीच्या तयारीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - यंदा फुलंब्री तालुक्यासह खामगाव आणि परिसरात पावसाने चांगलीच साथ दिल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाचा पेरा वाढवला आहे. त्यातच गहू पिकाचा विक्रमी पेरा झाला असून सरासरी उत्पादनदेखील वाढणार आहे. महाशिवरात्रीदरम्यान दरवर्षी लहरी पावसाचा धोका लक्षात घेता व ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी गहू मळणीकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. 
 
खामगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर हरियाणा आणि पंजाबसारख्या राज्यातून हार्वेस्टर मशीन दाखल झाले आहे. मजुरांकडून जास्तीच्या मजुरीची मागणी होत असल्याने व जास्तीची किंमत देऊनही पीक हातात पडण्याची हमी नसल्याने शेतकऱ्यांनी हार्वेस्टरद्वारे मळणी करण्यास सुरुवात केली आहे. गव्हाला एकरी ५ ते ६ हजार रुपये खर्च झालेला आहे. हार्वेस्टरने मळणी केल्यास एकरी १५०० ते १६०० रुपये  इतका खर्च येतो. कमी वेळेत मळणी असल्यामुळे शेतकरी हार्वेस्टरला पसंती दर्शवत आहेत.

हंगामात चांगली कमाई
- दररोज ३० ते ३५ एकर गव्हाची मळणी होते. शेतकऱ्यांना १५०० रुपये एकरी मोजावे लागतात. गव्हाच्या हंगामात अडीच ते तीन लाख रूपयांची कमाई होते. 
शिवकुमार, रा. श्यामगड, जि. कर्नाल, हरियाणा 
बातम्या आणखी आहेत...