आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या दिवशी बसवले १५ नळजोडण्यांवर मीटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अवैध नळजोडणी शोध मोहिमेसोबत पाणी बचतीसाठी नळांना मीटर लावण्याची मोहीम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २५ एप्रिलपासून सुरू केली आहे. पहिल्या दिवशी ३०० नळजोडण्यांची तपासणी करून १५ नळजोडण्यांवर मीटर बसवण्यात आले. विशेष म्हणजे यात एकही नळजोडणी अवैध आढळून आली नाही. या मोहिमेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

शहराला दररोज पाणीपुरवठा होत नसला तरी चार दिवसांचा पाणीपुरवठा एकाच दिवशी दिला जातो. प्रकल्पातील जलसाठा लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने नागरिकांना पाण्याच्या बचतीचे आवाहन केले जाते. परंतु, या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच अनेक ठिकाणी नळांना तोट्या नाहीत. तसेच दोनचाकी, चारचाकी वाहने धुण्याचा प्रकारही आढळून आला आहे. विद्युत जोडणीत ग्राहकाला मीटर दिले जाते. जेवढी वीज वापरली तेवढे देयक ग्राहकांना भरावे लागते. त्यामुळे वीज बचतीबाबत काही प्रमाणात नागरिक जागरूक आहेत. ही बाब लक्षात घेऊनच नळांना मीटर लावण्याचा प्रस्ताव उपमहापौर विनोद मापारी यांनी महासभेत मांडला होता. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर खऱ्या अर्थाने या निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. सोमवारपासून नळांना मीटर लावण्यासोबतच अवैध नळजोडणी शोधमोहीम सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी केशवनगर, मित्र उर्वरितपान
शक्तीकॉलनी, परिवार कॉलनी या भागातील ३०० पेक्षा अधिक नळजोडण्या तपासण्यात आल्या. या नळधारकांना या मोहिमेची माहिती देण्यात आली. या मोहिमेसाठी १७ टिम तयार करण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी संपूर्ण टिम कार्यरत नव्हती तसेच लग्नसराईमुळे अनेक नागरिकांशी संपर्क करता आला नाही याच सोबत कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजही सांभाळावे लागले. त्यामुळे पहिल्या दिवशी १५ नळजोडण्यांना मिटर बसविण्यात आले.

उपमहापौरांच्याघरापासून प्रारंभ : मोहिमेचाप्रारंभ उपमहापौर विनोद मापारी यांच्या निवासस्थानापासून करण्यात आला. विनोद मापारी यांच्या घरी नळजोडणीला मिटर बसविण्यात आले. मिटर बसविण्याचा संपूर्ण खर्चाचा भरणा उपमहापौरांनी तत्काळ केला.

अवैध नळधारकांना मिळाला दिलासा
अवैध नळजोडणी शोधमोहीम राबवल्यानंतरही संख्या स्पष्ट झाली नाही. यापूर्वी अवैध नळजोडणीधारकांकडून तीन ते पाच वर्षांची पाणीपट्टी आकारली गेली. परंतु, या वेळी त्यांना दिलासा दिला आहे. अवैध नळजोडणी आढळल्यास नळजोडणीसाठी येणारा पाच हजार ५० रुपये खर्च आणि मीटर लावण्यासाठी येणारा खर्च एवढेच पैसे वसूल केले जातील.
१५ रुपये प्रती युनिट
मीटरलावल्यानंतर १५ रुपये प्रती युनिटप्रमाणे नागरिकांना देयक द्यावे लागणार आहे. एक हजार लीटरचा एक युनिट आहे. जोपर्यंत एक हजार लीटर पाणी घेतले जाणार नाही तोपर्यंत एक युनिट पूर्ण होणार नाही. ज्या िदवशी पाणीपुरवठा बंद असेल त्या दिवशी मीटरसुद्धा बंद राहील, तर ज्या ठिकाणी पाण्याचा वापर व्यवसायासाठी केलेला असेल त्या नळधारकाला ५० रुपये प्रती युनिट भरावे लागतील.

पहिल्याच दिवशीराबवलेल्या मोहिमेत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. एकाही ठिकाणी नागरिकांनी विरोध केला नाही. ही मोहीम आता दररोज राबवण्यात येणार असून, येत्या काही दिवसात या मोहिमेला गती दिली जाईल. सुरेश हुंगे, कार्यकारीअभियंता


असा येईल मीटर लावण्यासाठी नागरिकांना खर्च
नागरिकांना महापालिकेने नियुक्त केलेल्या कंपनीकडूनच मीटर घेण्याची सक्ती नाही. महापालिकेने नियुक्त केलेल्या कंपनीकडून अर्धा इंची नळजोडणीसाठी मीटर घेतल्यास १४०० रुपये तसेच ९०० रुपये मीटर जोडणी (खोदकामासह) तसेच कपलरसह चिल्लर साहित्य २५० ते २७० रुपये असा खर्च येणार आहे. तर, पाऊण इंची नळधारकाला २६०० रुपयाचे मीटर घ्यावे लागेल. उर्वरित खर्च अर्धा इंची नळजोडणी एवढाच येणार आहे. नागरिक स्वत: मीटर आणू शकतात.