आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवसाआड पाणी प्रयोग चांगला; उतावीळपणा भोवण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेच्यापाणीपुरवठा विभागाने प्रायोगिक तत्त्वावर दोन जलकुंभांवरून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वीही झाला. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने हा प्रयोग संपूर्ण शहरात राबवण्याचा निर्णय विचाराधीन आहे. परंतु, तूर्तास काटेपूर्णा प्रकल्पात उपलब्ध जलसाठ्याचा विचार करता, बिगर सिंचनाचे पाणी आरक्षित करण्यासाठी अद्यापही दहा दशलक्षघनमीटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे प्रयोग यशस्वी झाला असला तरी उताविळपणा भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिकारी बदलले की, प्रयोग सुरू होतात. महापालिका पाणीपुरवठा विभागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी नव्याने रुजू झाले आहेत. त्यांच्या ज्ञानाचा वापर त्यांनी अकोला पाणीपुरवठा योजनेतील दुरुस्त्या करण्यात वापरला. एवढेच नव्हे, तर मजीप्राकडे पाणीपुरवठा योजना हस्तांतरणासाठी राखीव ठेवलेले ११ कोटी ८४ लाख रुपये केवळ पाणीपुरवठा योजनेवर खर्च व्हावेत, यासाठी पदाधिकारी प्रशासन यांचे मन वळवले. त्यामुळे हा संपूर्ण निधी पाणीपुरवठा विभागातील कराव्या लागणाऱ्या विविध बदलांवर केला जाणार आहे. याच धर्तीवर पाणीपुरवठा एक दिवसाआड अथवा दोन दिवसांआड कसा होईल? याचा अभ्यास करून प्रायोगिक तत्त्वावर कौलखेड भागात ही योजनाही राबवली. हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे काही तांत्रिक बदल केल्यास शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे, ही बाब सिद्ध झाली. या प्रयोगाचे सर्वांनी अभिनंदन केले. हा प्रयोग टप्प्या-टप्प्याने शहरातील १३ ही जलकुंभांवर करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.
परंतु, यंदा पावसाने पुन्हा दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णामध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यातून शहराला वर्षभर पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र, काटेपूर्णा प्रकल्पावर अकोला पाणीपुरवठा योजनेची मक्तेदारी नाही. अन्य गावांनाही याच प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. काटेपूर्णातील जलसाठा लक्षात घेता, हा प्रयोग संपूर्ण शहरात राबवल्यास आणि पावसाने दडी मारल्यास मार्चनंतर पाणीपुरवठा करताना अडचणींचे ठरू शकते. त्यामुळेच काटेपूर्णातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन हा प्रयोग राबवावा, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मोर्णेतपाणी पण आणायचा प्रश्न : मोर्णाप्रकल्पातील आरक्षण रद्द झाले, तरी टंचाईच्या काळात या प्रकल्पातील पाण्याची उचल करता येईल. पण, मोर्णातून थेट जलवाहिनीच्या माध्यमातून पाण्याची उचल करता येत नाही. नदीच्या माध्यमातून उचल केल्यास खर्च अधिक पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधायचा कुठे आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी आणायचा कोठून आदी प्रश्न उभे ठाकले आहेत.

परंतु,या वर्षी पावसाने पुन्हा दडी दिल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध जलसाठ्यातून शहराला वर्षभर पाणीपुरवठा होऊ शकतो. परंतु, काटेपूर्णा प्रकल्पावर अकोला पाणीपुरवठा योजनेची अथवा महापालिकेची मक्तेदारी नाही. इतर गावातील पाणीपुरवठा योजनांनाही याच प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ही बाब लक्षात घेणेही गरजेचे आहे. काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा लक्षात घेता, हा प्रयोग संपूर्ण शहरात राबवल्यास आणि पावसाने दडी मारल्यास मार्चनंतर पाणीपुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच काटेपूर्णा प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन हा प्रयोग राबवावा, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मोर्णेत पाणी पण आणायचा प्रश्न
मोर्णा प्रकल्पातील आरक्षण रद्द झाले असले तरी टंचाईच्या काळात या प्रकल्पातील पाण्याची उचल करता येईल. पण, मोर्णा प्रकल्पातून थेट जलवाहिनीच्या माध्यमातून पाण्याची उचल करता येत नाही. नदीच्या माध्यमातून उचल केल्यास खर्च, अपव्यय अधिक तसेच पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधायचा कुठे? आणि शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी आणायचा कोठून? आदी प्रश्न उभे ठाकले आहेत.

अद्यापही १० दलघमीची गरज
काटेपूर्णाप्रकल्पात तूर्तास २३.६३ दशलक्षघनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. बिगर सिंचनासाठी ३४.३२ दलघमी पाणी लागते. ही बाब लक्षात घेता, अद्यापही १० दलघमी पाण्याची गरज आहे, तर बिगर सिंचनासाठी आरक्षित पाण्याची वर्षाकाठी प्रत्यक्षात २४.७६ दलघमी पाण्याची उचल केली जाते. म्हणजेच प्रत्यक्ष उचल करावी लागणारे पाणीही काटेपूर्णा प्रकल्पात उपलब्ध नाही.
परतीच्या मान्सूनची पाहावी लागेल वाट
^गतआठवड्यापासूपावसाने दडी मारली आहे. परतीच्या मान्सूनची वाट पाहा. त्यानंतर पाणीपुरवठा एक दिवसाआड अथवा दोन दिवसांआड करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवल्यास तो अधिक यशस्वी होईल. कारण मागील वर्षीही सिंचन झाले नव्हते, ही बाबही लक्षात घेणे गरजेचे आहे.'' डॉ.सुभाष टाले, जलतज्ज्ञ, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
पाणीटंचाई
सप्टेंबरसुरू होऊनही प्रकल्पात ५० टक्केही जलसाठा उपलब्ध नाही. पुढे दुर्दैवाने पावसाने दडी मारल्यास, प्रयोगाच्या माध्यमामुळे अधिक पाण्याची उचल झाल्यास शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.
३४.३२ बिगर सिंचनासाठी
काटेपूर्णाचीएकूण साठवण क्षमता ८६.३६ दलघमी आहे. यात ३४.३२ दलघमी बिगर सिंचनासाठी वापरले जात. उर्वरित पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. त्यामुळे काटेपूर्णा प्रकल्पात किमान ३५ दशलक्षघनमीटर साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आरक्षित पाणी आणि प्रत्यक्ष उचल