आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीटर लावलेल्या नागरिकांना मिळणार 12 रुपये युनिटने पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पाणीबचतीसह पाण्याचे महत्व कळावे या बरोबरच वॉटर ऑडीट सुलभरित्या करता यावे, यासाठी महापालिकेने नळांना मिटर लावण्याची मोहिम सुरु केली आहे. चालु आर्थिक वर्षात ज्या नळधारकांकडे नळांना मीटर बसवण्यात आले आहे. त्यांना त्यांनी जेवढे पाणी वापरले असेल त्यानुसार मीटर प्रमाणे बिल दिले जाणार आहे. यासाठी महापालिकेने युनिट नुसार पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एक हजार लिटरचा एक युनिट असून एक युनिटसाठी १२ रुपये यानुसार पाणीपट्टी आकारली जाणार आहे. महापालिकेच्या वतीने काही भागात तीन दिवस तर काही भागात चार दिवसाआड पाणी पुरवठा होत असला तरी ज्या दिवशी पाणी पुरवठा होतो, त्या दिवशी सर्व दिवसांचा पाणी पुरवठा एकाच दिवशी केला जातो. तुर्तास दरडोई, दर दिवशी १०० लिटर या नुसार पाणी पुरवठा केला जात आहे. एका कुटुंबात पाच व्यक्ती गृहीत धरल्यास एका कुटुंबाला दररोज ५०० लिटरचा पाणी पुरवठा होत आहे. 
 
या अनुषंगाने एका कुटुंबाला महिन्याकाठी १५ युनिट पाण्याचे पैसे द्यावे लागणार आहे. या नुसार दररोज ५०० लिटर पाणी घेतल्यास महिन्याला १८० रुपये बिल द्यावे लागेल. वर्षाकाठी २१६० रुपये लागणार आहे. तुर्तास वर्षाकाठी १८०० रुपये पाणीपट्टी द्यावी लागते. या तुलनेने विचार केल्यास मीटर लावल्यास पाणीपट्टी कमी होणार आहे. कारण ज्या कुटुंबात दोन ते तीन व्यक्ती आहे, असे कुटुंब दिवसाला २०० ते ३०० लिटर पाणी घेतील. त्यामुळे या अशा कुटुंबांना ७५ रुपये ते ११० रुपये महिनाच पाणीपट्टी द्यावी लागणार आहे. त्यामुळे पाणी आणि पैशाची बचत होईल. तर ज्या नळधारकांकडे अद्याप नळांना मिटर बसवलेले नाही, त्यांच्याकडून वर्षाकाठी पाणीपट्टी घेता, महिन्याकाठी १५० रुपये या नुसार पाणीपट्टी घेतली जाणार आहे.
 
पाण्याची उधळपट्टी थांबेल : तुर्तासवर्षाकाठी पाणीपट्टी आकारली जाते. दरडोई १०० लिटरनुसार पाणी पुरवठा केला जात असला तरी यापेक्षा अधिक पाण्याची उचल केल्यास पाणीपट्टीत वाढ होत नाही. त्यामुळे एकीकडे गोड्या पाण्याची नासाडी तर दुसरीकडे पाण्यासाठी भटकंती कसे परस्पर विरोधी चित्र शहरात पाहावसाय मिळते. 
 
असे होईल देयकाचे वितरण : १३ हजार नळांना मिटर बसवण्यात आले आहे. प्रत्येक नळधारकाला एका महिन्याचे देयक देणे शक्य नाही. त्यामुळे जेवढे नळधारक आहेत, त्यांना तीन भागात वाटून एका भागाला एक महिन्याचे, दुसऱ्या भागाला दोन महिन्याचे तर तिसऱ्या भागाला तीन महिन्याचे देयक वितरीत केले जाणार आहे. हे काम साखळी पद्धतीने केले जाणार आहे. 
 
नागरिकांनी सहकार्य करावे 
- आतापर्यंत नळांना मीटर लावताना नागरिकांनी सहकार्य केले आहे. अद्याप हजारो नळधारकांकडे मीटर जोडण्याचे काम शिल्लक आहे. नागरिकांनी नळांना मिटर बसवुन सहकार्य करावे. सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग 
बातम्या आणखी आहेत...