आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न‌ळांच्या मीटरसाठी अाता निविदा, सहा महिन्यांचा मिळू शकतो कालावधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पाण्याचाअपव्यय रोखण्यासाठी घरगुती नळांना मीटर बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या अनुषंगाने या महिन्यात ई- निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यात मीटर खरेदीसाठी नागरिकांकडे दोन पर्याय उपलब्ध राहणार असून, यासाठी सहा महिन्यांचा कालावधी नागरिकांना मिळणार आहे.
काटेपूर्णा प्रकल्पात जलसाठा कमी असल्यामुळे शहराला तीन ते चार दिवसआड पाणीपुरवठा होत आहे, परंतु अद्यापही पाण्याच्या बचतीप्रति जागरूकता निर्माण झालेली नाही. त्यामुळेच शहराच्या अनेक भागांत अद्यापही नळांना तोट्या नाहीत. नळांना तोट्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे उपमहापौर विनोद मापारी यांनी नळांना मीटर बसवण्याचा प्रस्ताव महासभेसमोर मांडला होता. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली होती. परंतु, या प्रस्तावाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नव्हती. मात्र, आता प्रशासनाने यात पुढाकार घेतला आहे. आयुक्त अजय लहाने यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नळांना मीटर बसवण्याबाबतच्या निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. नागरिकांना मीटर खरेदी करण्यासाठी प्रशासन दोन पर्याय उपलब्ध करून देणार आहे. या निविदेच्या माध्यमातून कंपनीला नागरिकांना मीटर पुरवणे आणि जोडणी करून देणे, असे काम दिले जाणार आहे. मीटर आणि जोडणीचा खर्च हा नागरिकांना द्यावा लागणार आहे. नळाच्या इंचीनुसार मीटर जोडणीचे पैसे आकारले जातील, परंतु मीटरची किंमत मात्र सारखी आकारली जाणार आहे. परंतु, ज्या नागरिकांना महापालिकेने नियुक्त केलेल्या कंपनीकडून मीटर खरेदी करायचे नसतील त्या नागरिकांना स्वतंत्रपणे मीटर खरेदी करण्याची मुभा प्रशासनाकडून दिली जाणार आहे. या दोन पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची संधी नागरिकांना दिली जाणार आहे.

खर्चहा नागरिकांना द्यावा लागणार आहे. नळाच्या इंचीनुसार मीटर जोडणीचे पैसे आकारले जातील, परंतु मीटरची किंमत मात्र सारखी आकारली जाणार आहे. परंतु, ज्या नागरिकांना महापालिकेने नियुक्त केलेल्या कंपनीकडून मीटर खरेदी करायचे नसतील त्या नागरिकांना स्वतंत्रपणे मीटर खरेदी करण्याची मुभा प्रशासनाकडून दिली जाणार आहे. या दोन पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची संधी नागरिकांना दिली जाणार आहे.

अवैध नळजोडण्याही होतील वैध
याच सोबत अवैध नळजोडणी वैध करण्यासाठी निविदा बोलावल्या जाणार आहे. संबंधित कंपनीने शहरातील प्रत्येक नळजोडणीची तपासणी करून ज्या नागरिकांकडे अवैध नळजोडण्या आहेत, त्या जोडण्या वैध करण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. विशेष म्हणजे अवैध नळजोडण्या वैध करताना तीन ते पाच वर्षांची पाणीपट्टी आकारण्याच्या मानसिकतेत प्रशासन आहे. केवळ नळजोडणीचा खर्च आणि चालू वर्षाची पाणीपट्टी आकारावी, जेणेकरूनही नळजोडण्या वैध करण्यात नागरिकही पुढाकार घेतील, असा प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात एकाच वेळी मीटर बसवणे आणि नळजोडण्या वैध करण्याची मोहीम सुरू होईल.

सहा महिन्यांची मिळणार मुदत
एकाच वेळी शहराच्या सर्व भागात मीटर बसवणे शक्य नाही तसेच सर्वच नागरिक एकाच वेळी मीटर खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे निविदा प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामाचे आदेश दिल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यांच्या आत नागरिकांना नळांना मीटर बसवण्याची मुदत प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या मीटरची किंमत जोडणीसह १२०० रुपये अपेक्षित आहे.

युनिटप्रमाणे पैसे आणि पाण्याची बचत
नळांनामीटर बसवल्यानंतर युनिटप्रमाणेच नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे पाण्याच्या अपव्ययाला आळा बसेल आणि पाण्याची बचतही होईल. तसेच अद्याप युनिटचा दर निश्चित केलेला नसला तरी सर्वसामान्य नागरिकांना परवडेल, यानुसार दर निश्चित केले जातील. अजय लहाने, आयुक्तमहापालिका.