आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गाव करी ते राव करी’चा प्रत्यय, आधी करू जलसंवर्धन नंतरच मुला-मुलींच्या लग्नाचा विचार’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- ‘गावकरी ते राव करी’ अर्थात संपूर्ण गावकऱ्यांनी मनावर घेतले तर एखादे कठीण कार्य कसे पूर्ण होऊ शकते हे अकोट ता. खैरखेड येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. खैरखेड येथे भूगर्भातील जलपातळी कमी झाली त्यामुळे शेतीसाठी सिंचन करताना अडचणी वाढल्यात यावर एकच उपाय म्हणजे जलसंवर्धन भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पाणी अडविले पाहिजे ते जमिनीत मूरविले पाहिजे हे गावातील लोकांना पटले आणि त्यांनी जलसंवर्धन चळवळ राबविण्याचा निर्णय घेतला. 

पण या चळवळीला गावातील लग्न समारंभामुळे व्यत्यय येत होता. ग्रामीण भागात लग्न समारंभासाठी संपूर्ण गाव हजर असते नानमुखाचा कार्यक्रम नंतर लग्न समारंभासाठी वरातीत जाणे आणि परत आल्यावर वरात पंगत असे तीन ते चार दिवस एका लग्नात जात होते. गावात बऱ्याच तरुणाचे विवाह जुळले आहेत. गावातील मुलगी असल्यास विवाह सोहळ्यात जास्तच दिवस जातात त्यामुळे जलसंधारण चळवळीला खिळ बसत होती. 
 
जलसंधारणाचे कामे पावसाळ्या पूर्वीच करायची असतात.एकदा पाऊस सुरू झाला की मग कामे करता येत नाहीत. त्यामुळे भर उन्हाळ्यात ही कामे करायची असतात. पेरणी पूर्व मशागतीची कामे त्यांना उन्हाळ्यातच करावी लागतात शेतीची नांगरणी वरवरणी करून शेत पेरणी साठी तयार करून ठेवावे लागते.त्यामुळे ग्रामस्थ त्यांच्या शेती कामातही व्यस्त असतात. या मर्यादित कालखंडात ही कामे करायची असल्याने लग्न समारंभ विशिष्ट कालावधीमध्ये करायचीच नाहीत.असा निर्णय दि मार्च च्या सभेत घेतला आहे.त्यामुळे ग्रामस्थ आता शेती सोबतच जलसंवर्धनाच्या कामातही वेळ देत आहेत. महिला वर्ग सायंकाळी तर पुरुष वर्ग सकाळी श्रमदान करित आहे. 
 
गावकरी सकारात्मक 
-जलसंवर्धन चळवळीसाठी गावकरी सकारात्मक आहेत.सर्वानी या कामात सहभागी व्हावे.लग्न समारंभ थांबविण्याची गरज नाही.कालीदास तापी, बीडीओ अकोट. 
 
24 तास श्रमदान: दि 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी गावातील सर्व नागरिक 24 तास जलसंवर्धनासाठी श्रमदान करणार आहेत. 
 
पाणी पातळी वाढेल 
-पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविल्यानंतर गावातील पाण्याच्या पातळीमध्येे निश्चितच वाढ होणार आहे. केशवराव मेतकर, ग्रामस्थ खैरखेड. 
 
आधी लग्न जलसंवर्धनाचे 
दि 8 एप्रिल ते दि 22 मे या कालावधीत गावातील मुलांचे किंवा मुलींचे लग्न होणार नाही हा कालावधी जलसंवर्धनाच्या कामासाठी राखून ठेवण्यात आला आहे. 
 
वॉटर कप मध्ये सहभाग -अभिनेता अमिर खान आयोजित वॉटर कप या स्पर्धेमध्ये खैरखेडने सहभाग घेतला आहे .

पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवल्यानंतर गावातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्याने ग्रामस्थांनी कामही सुरू केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...