आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेला: अाता अाठव्या दिवशी पाणीपुरवठा, 21 अाॅगस्टपासून राबवण्यात येणार निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - पावसाने मारलेली दडी अाणि काटेपूर्णा प्रकल्पामध्ये असलेला १५.७२ अर्थात १८.२० टक्के जलसाठा असल्याने महापालिकेने २१ अाॅगस्टपासून दर अाठव्या दिवशी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. 
 
पाऊस जुलै अाणि अाता ऑगस्ट रुसल्याने काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झालेली नाही. काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला, मूर्तिजापूर, ६४ खेडी आदी पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र पावसाने मारलेली दडी लक्षात घेऊन महापालिकेने पाण्याचे नियाेजन करणे अावश्यक हाेते. मात्र तसे झाले नाही. दरम्यान, जिल्हयात विविध भागात पाणी टंचाई जाणवत असून, पावसाची शाश्वती आहे किंवा नाही, याबाबत काही सांगता येत नाही. त्यामुळे २१ अाॅगस्टपासून पाणी पुरवठा होणार दर अाठव्या दिवशी हाेणार अाहे, असे जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेष हुंगे यांनी कळवले अाहे. 
 
मंगळवारी पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक : प्रकल्पातीलसाठा अाणि रुसलेला पाऊस लक्षात घेऊन संभाव्य पाणी टंचाई निवारण्यासाठी पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवनात बैठक हाेणार अाहे. बैठकिला लाेकप्रतिनिधी अधिकारी उपस्थित राहणार अाहेत. 
 
ग्रामीण भागात जलसंकट तीव्र 
काटेपूर्णाप्रकल्पातून मू्र्तिजापूर आणि ६४ खेडी पाणी पुरवठा योजनेला पाणी देण्यात येते. प्रकल्पातून नदीच्या माध्यमातून पाणी सोडून खांबोरा उन्नयी बंधाऱ्यात हे पाणी अडवले जाते. मात्र या प्रक्रियेत पाण्याचा अपव्यय हाेत असून, पाणी साेडण्याचा उद्देशच सफल हाेत नाही. त्यामुळे तुर्तास या योजनांसाठी पाणी साेडण्यात येणार नाही. परिणामी या गावांमध्ये पाऊस अाल्यास तीव्र पाणी टंचाई निर्माण हाेणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...