आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६४ गाव खांबाेरा पाणीपुरवठा याेजनेसाठी २३.७८ काेटी मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला -  ६४ गाव खांबाेरा पाणीपुरवठा याेजनेसाठी शासनाने शुक्रवारी २३. ७८ काेटी रुपये मंजूर केले. या निधीतून काटेपूर्णा प्रकल्पातून खांबाेरा बंधाऱ्यापर्यंत पाइनलाइनद्वारे पाणी पाेहाेचणार अाहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार अाहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप खासदार संजय धाेत्रे, अामदार रणधिर सावरकर, अामदार गाेवर्धन शर्मा यांनी पाठपुरावा करून मुद्दा लावून धरला हाेता. 
 
खारपाणपट्ट्यातील ग्रामस्थांना नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागताे. भूगर्भातील पाणी पिण्यायोग्य नाही. गोड्या पाण्याच्या विहिरी नाहीत. ऑक्टोबर अखरेच नदी प्रवाह आटून जातात. अनेकदा पाणीपुरवठा योजनेंतर्गत दुरुस्तीची कामे विहित मुदतीत हाेत नाहीत. कधी दुरुस्ती हाेत नाहीत, तर कधी दुरुस्ती हाेऊनही पाणीपुरवठा हाेत नाही. सध्या खारपाणपट्ट्यातील ६४ गावांना खांबाेरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी काटेपुर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येते. सदर पाणी नदीद्वारे सोडण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. दरम्यान,या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न साेडवण्यासाठी लाेकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. अखेर काटेपूर्णा प्रकल्प ते खांबाेरा बंधाऱ्यापर्यंत पाइपलाइनद्वारे पाणी पाेहाेचण्यासाठी २३.७८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. ही मंजुरी पाणी टंचाई अंतर्गत विशेष बाब म्हणून देण्यात अाली. 

...त्यामुळे मजीप्राकडे जबाबदारी 
जिल्हा परिषदेच्या बेताल कारभारामुळे ग्रामीण भागात कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागतो. अनेकदा कर थकल्याने प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेतून हाेणारा पाणीपुरवठा खंडीत करण्यात येताे. कर वसुली इतरही प्रशासकीय कामाकाजासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे अधिकारी अनेकदा विविध सभांमध्ये सांगतात. सन २०१६-१७ या अार्थिक वर्षात जिल्ह्यात केवळ ८.१ टक्के प्रादेशिक पाणीकर वसुली झाली अाहे. त्यामुळे अाता या याेजनेवरील निधी खर्च करण्यासह इतरही जबाबदारी मजीप्राकडे दिली अाहे. 

लवकरच अंमलबजावणी 
पाइपलाइन टाकण्याच्या प्रस्तावाची त्वरित अंमलबजवणी हाेण्यासाठी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मंत्रालयात तातडीने पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते. ही याेजना तातडीने मार्गी लावण्याची मागणी हाेत अाहे.

काटेपूर्णा प्रकल्पातून नदी प्रवाहाद्वारे खांबाेरा बंधाऱ्यापर्यंत पाणी साेडण्यात येते. हा प्रसाव सुमारे २३ किमी प्रवास अाहे. नदीपात्र रुंद कोरडे असणे, कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवन हाेणे, अशा कारणांमुळे सुमारे ८०% पाणी वाया जाते. गत वर्षी टंचाई परिस्थितीत २५ एप्रिल २०१६ रोजी प्रकल्पातून या योजनेसाठी दश लक्ष घन मीटर सोडलेले पाणी अर्ध्या अंतरातच वाया गेले हाेते. ते पाणी बंधाऱ्यापर्यंत पोहोचलेच नाही. पाणी पाइपलाइनद्वारे पाेहाेचणार असल्याने यानंतर पाणी वाया जाणार नाही. 

पाणी गुरुत्वाकर्षणामुळे पाेहाेचणार असल्याने विजेचा खर्च हाेणार नाही. तसेच बचत केलेले पाणी अन्य प्रयोजनासाठी वापरात येईल. पाटबंधारे विभागाने १० एप्रिल २०१७ च्या एका पत्रानुसार एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी ०.५५ दशलक्ष घनमीटरची आवश्यकता हाेती. याची पूर्तता करण्यासाठी ६.६६ दशलक्ष घनमीटर पाणी सोडावे लागले. यावरून पाणी अपव्ययाची स्पष्टता होते. 
 
बातम्या आणखी आहेत...