आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभयारण्य परिसरातील विहिरींना आता सुरक्षा कठडे, वन्यजीवांना मिळणार सुरक्षा, ५६ विहिरींची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दरवर्षीविहिरीत वन्यजीव पडल्याच्या घटना घडतात. त्यानंतर या वन्यजीवांना वाचवण्यासाठी वन, वन्यजीव विभागासह स्वयंसेवी संस्था, निसर्गप्रेमींची धावपळ होते. अशात एखाद्या वन्यजीवाला प्राणही गमवावा लागतो. यावर उपाय म्हणजे जंगल परिसरातील विहिरींना सुरक्षित कठडे हा असला तरी त्यासाठी गावकरी पुढाकार घेताना दिसत नाहीत. आता अकोला वन्यजीव विभागाने विहिरींना कठडे बांधण्यासाठी पुढाकार घेतला असून, पहिल्या टप्प्यात ५६ विहिरींवर कठडे बांधण्यात येत आहेत.

दरवर्षी उन्हाळ्यात अन्न, पाण्याच्या शोधात वन्यजीव गावाच्या दिशेने धाव घेतात. अनेकदा रात्रीला कठडे नसलेल्या विहिरीत वन्यजीव पडतात. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर वन्यजीवांना बाहेर काढण्यात यश येते. मात्र, हा प्रकार टाळण्यासाठी विहिरींना जाळी बसवल्यास किंवा कठडे बांधल्यास त्यावर आळा घालता येतो. यासाठी अनेकदा ग्रामीण परिसरातील नागरिकांना विहिरींना कठडे बांधण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात येते, मात्र फार कमी विहिरींवर कठडे बांधण्यात येतात. त्यामुळे आता अकोला वन्यजीव विभागाने विहिरींना कठडे बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वन्यपशू निसर्ग संरक्षण क्षेत्रात संवर्धनासाठी राज्य योजनेतून त्याकरिता लाख ४० हजारांचा निधी प्राप्त झाला. त्यामधून एका विहिरीसाठी १३ हजार २०० इतका खर्च करण्यात येणार आहे. या निधीतून प्रत्येक विहिरीला मीटर उंचीचे कठडे बांधण्यात येणार आहे. अकोला वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत काटेपूर्णा अभयारण्य असून, या अभयारण्यानजीकच्या गावातील विहिरींमध्ये वन्यजीव पडण्याच्या घटना घडतात. यामध्ये मुख्यत्वे बार्शिटाकळी, पातूर तालुक्यातील गावांचा समावेश आहे.


विहिरींची निवड : वन्यप्राणीविहिरीत पडू नये म्हणून काटेपूर्णा अभयारण्य नजीकच्या गावातील ५६ विहिरींची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे. यामध्ये फेट्रा वनक्षेत्रात १८, कासमार वनक्षेत्रात १४, पिंपळशेंडा वनक्षेत्रात १८, तर वनोजा वनक्षेत्रात विहिरींचा समावेश आहे.
नुकतीच एका बिबट्याची सुटका
बार्शिटाकळीतालुक्यातील धाबा गावानजीक निंबी शेतशिवार परिसरात नुकताच ऑगस्टला एक बिबट विहिरीत पडला होता. ८० फूट खोल विहिरीला २० फूट पाणी असल्याने लाकडाच्या ओंडक्याच्या साहाय्याने काही तास बिबट्याने काढले. नंतर नागरिक वन विभागाच्या पुढाकाराने बाजीद्वारे त्याची सुटका झाली. या विहिरीलादेखील कठडे नव्हते, हे विशेष.