आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव सांगून ब्लॅकमेल करणाऱ्याला केली अटक, सोलापुरातून घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- तुमच्या मेडिकलमधील औषधीने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे प्राप्त झाली आहे. तुमच्यावरील कारवाई टाळायची असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, असा धमकीवजा फोन करून ब्लॅकमेल करणाऱ्यांच्या विरोधात खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्य सुत्रधार खंडणीबहाद्दरास पोलिसांनी गुरुवारी सोलापुरातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. 
 
दत्त मेडिकलचे संचालक प्रकाश सावल यांचा भाचा भुपेश मुंदडा हे तुकाराम चौकातील दत्त मेडिकल चालवतात. शनिवारी दुपारी ते मेडिकलमध्ये असताना त्यांना सोलापूर येथून नोव्हेंबर रोजी फोन आला. तुमच्या दुकानातून एका मुलीने औषध खरेदी केले. सदरचे औषध त्या मुलीने घेतल्याने तिचा मृत्यू झाला असून, या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. दत्त मेडिकल्सवरील औषधीमुळे एका मुलीचा जीव गेल्याने शहरातील तीन ठिकाणी असलेले मेडिकल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ही कारवाई टाळण्यासाठी सदर मोबाइलवर बोलणाऱ्याने मुंदडा यांना ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली; मात्र मुंदडा यांनी याप्रकरणी खंडणी मागणारा सोलापूर येथील रहिवासी नितीन अनिल जाधव मधुकर संभाजी गवळी या दोघांना विश्वासात घेतले त्याचे खाते क्रमांक घेऊन त्यामध्ये ५०० रुपये जमा केले. सदर रक्कम जमा होताच या दोन्ही खंडणी बहाद्दरांनी मुंदडा यांना पुन्हा फोन करून ५० हजार रुपये टाकण्याचे सांगितले; मात्र मुंदडा यांनी मशीन नादुरुस्त असल्याचे कारण सांगून दुसऱ्याच दिवशी पैसे टाकणार असल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार पोलीस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्याकडे केली. 

पोलीस अधीक्षक मीणा यांनी प्रकरण सायबर सेलकडे चौकशीसाठी दिले. सायबर सेलने नितीन जाधव आणि मधुकर गवळी या दोन्ही आरोपींना सोलापूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध खदान पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, तसेच यामधील फरार असलेला तिसरा मुख्य आरोपी सुरज सुरेश काळे याला खदान पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली आहे. 

यापूर्वी दोघांना केली अटक 
खंडणीच्या प्रकरणामध्ये यापूर्वी सोलापूर येथील दोघांना अटक केली हाेती. त्यांना पोलिस कोठडीही सुनावण्यात आली होती. त्यांनी पोलिस कोठडी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार त्याने सुरज सुरेश काळे याचे नाव सांगितले होते. सुरज काळे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
बातम्या आणखी आहेत...