आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पाेलिसांवरच खाकीची जबाबदारी, महिला दिनानिमित्त पोलिस प्रशासनाचा उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महिलादिनी मंगळवारी पोलिस प्रशासनाचा कारभार महिला पोलिसांच्या हातात देण्याचा स्तुत्य उपक्रम अकोला पोलिस राबवत आहे. या दिवशीचे सर्व निर्णय महिला पोलिस घेणार असून, कायदा सुव्यवस्थेची दोरी आपल्या हाती घेणार आहेत.

महिलादिनानिमित्त महिलांना सलाम आणि त्यांचा आदर करण्याच्या उद्देशाने "एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू' या ओळीप्रमाणे पोलिस ठाण्यांमध्ये ठाणेदारांपासून तर, ठाणे अंमलदार, बीट मार्शल या सगळ्या जबाबदाऱ्या शहरातील महिलाच पार पाडणार आहेत. तसे नियोजन पोलिस प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये सहायक पोलिस निरीक्षकपदांपर्यंत अनेक महिला अधिकारी आहेत. मात्र, ठाणेदार म्हणून एकही महिला पोलिस अधिकारी जिल्ह्यात नाही. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना ठाणेदारपदाचा मान देऊन नारीशक्तीचा सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम अकोला जिल्हा पोलिस पहिल्यांदाच राबवत आहे. तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराचे समाधान आणि त्या दिवशीचा बंदोबस्तापासून पेट्रोलिंगचे नियोजन महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी करणार आहेत. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या महिला दक्षता कमिटीची सभा घेऊन महिला दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख वैशाली अढाव यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे.

विद्यार्थिनी देणार ठाण्यांना भेटी
शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतल्या जाणार आहे. पोलिसांच्या कामकाजाची त्यांना कल्पना असावी. त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून विद्यार्थ्यांचा सहभाग महिला दिनाच्या दिवशी ठेवण्यात आला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी व्यक्त केली आहे.

सर्व कामे महिला पाेलिसच पाहतील
नारीशक्तीचासन्मान व्हावा. म्हणून प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला तिचे सध्याचे जे पद आहे. त्यापेक्षा वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी या दिवशी देण्यात येत आहे. ठाणेदारापासून सर्व कामकाज या दिवशी महिलाच पाहणार आहेत.'' विजयकांत सागर, अप्परपोलिस अधीक्षक.