आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा स्त्री रुग्णालयात बेड 300, भरती महिला मात्र 400, अाराेग्य विभागाची अनास्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- लेडीहार्डिंग म्हणून आेळखल्या जाणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांसाठी अपुरी व्यवस्था आहे. रुग्णालयात ३०० बेड असून दाखल होणाऱ्या महिलांची संख्या ३८५ ते ४०० अाहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या अतिरिक्त १०० महिलांची चांगलीच गैरसोय होत अाहे. तसेच रुग्णालय प्रशासनाचीही तारांबळ उडत अाहे.
 
महिलांच्या अाराेग्यासाठी असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात साेईसुविधांचाही माेठा अभाव अाहे. रुग्णालयामध्ये वॉर्ड, प्रसूती कक्ष, कुपोषित बालकांसाठी कक्ष तसेच ४८ खाटांचे विशेष नवजात शिशू दक्षता केंद्र आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या परिसरामध्ये नवीन वास्तूची निर्मिती होत असून त्यामध्ये २० खाटांचे नवीन केंद्र राहील.
 
जागा विस्तार झाल्यास सध्याची अडचण दूर होऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. रुग्णालयाकडे महिलांना पोहचवण्यासाठी गाड्यांची व्यवस्था आहे. परंतु त्यातील दोन गाड्या सध्या नादुरुस्त आहेत.
 
शासनाकडे मागणी
रुग्णालयामध्ये रिक्तपदांमुळे दैनंदिन काम करताना अडचणी येतात त्यामुळे ही पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. तसेच प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या वाढली तर जागेअभावी काहीच करता येत नाही. आमच्याकडे उपलब्ध अतिरिक्त बेड महिलांसाठी दिले जातात. कारण २००९-१० मध्ये १० हजार बाळंतपण व्हायचे ही संख्या आता १७ हजारापर्यंत पोहचली आहे. नवीन वास्तूमध्ये डिलीवरी रुम घेतली आहे.''
- डॉ.आरती कुलवाल, अधिक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय.
 
बातम्या आणखी आहेत...