आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरगावमंजू: अंगावर दगड पडल्याने मजूर महिला जागीच ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली. - Divya Marathi
पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली.
बोरगावमंजू - बोरगावमंजू येथील एका गिट्टी खदानवर काम करणाऱ्या ५० वर्षीय मजूर महिलेचा काम करत असताना होपरजवळ टिप्परमधील दगड टाकताना ६० किलो वजनाचा दगड अंगावर पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मार्च रोजी घडली. महिला गंभीर जखमी झाल्याने महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 
 
रामजीनगर स्थित रहिवासी मनसुराबी सै. ताेहर अली, वय ५० वर्षे ह्या येथील तापडीया यांच्या गिट्टी खदानवर मजूर म्हणून कामावर होत्या. दरम्यान, आज मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्यादरम्यान होपरमध्ये एका टिप्परमधील दगड टाकत असताना अंदाजे ५० ते ६० किलो वजनाचा दगड सदर महिलेच्या अंगावर पडला. यामध्ये सदर महिला गंभीर जखमी झाली. यामध्ये घटनास्थळावरच महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर नागरिक जमा झाले. ठाणेदार पी. के. काटकर यांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, अशोक गवई यांनी फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलिस करत आहेत. 
 
मृतक महिलेची परिस्थिती हालाकीची 
सदर महिलेच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असून, एक मुलगा, पती असा आप्त परिवार आहे. रोज कामाला गेल्याशिवाय पोटाची खळगी भरणे वा चुल पेटणे मुश्कील होते. त्यामुळे काम केल्याशिवाय पर्यायच नाही. मात्र, काम करताना महिलेचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. 
बातम्या आणखी आहेत...