आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या बाटल्या समोर ठेवून तहसीलसमोर महिलांचा योगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रामपूर- राज्यासह देशात कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी अस्तित्व संघटनेच्या महिलांनी २१ जून रोजी सकाळी साडे आठ वाजता संघटनेच्या अध्यक्षा प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात येथील तहसील कार्यालयासमोर दारूच्या बाटल्या समोर ठेवून अभिनव असे योगा आंदोलन केले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, मागील काही वर्षांपासून राज्यात दारूचा महापूर वाहत आहे. या दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद््ध्वस्त होत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील अनेक युवक दारूच्या आहारी गेले आहेत. या दारूमुळे भांडणाचे प्रमाण वाढीस लागले असून, अनेक गावांतील शांतता सुव्यवस्था धोक्यात आली आहे. राज्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी अनेक वेळा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यासह देशात कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी आज अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात महिला सदस्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर दारूच्या बाटल्या समोर ठेवून योगा आंदोलन केले. दारूबंदी केली तरच योग दिन साजरा करण्यात अर्थ असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या अनोख्या आंदोलनात शोभा भगत, सुजाता भगत, पंचफुला भगत, नंदा कोडगे, शोभा शेवाळे, धृपताबाई भगत, शोभा तळोकार, अनुराधा वाघ, अनुसया वाघ, ज्योती वाघ, उज्ज्वला नेवारे, सिंधू राऊत, अनिता नेवारे यांच्यासह असंख्य महिला पुरुष सहभागी झाले होते.

दारूबंदीसाठीनागपुरात केले होते मुंडण : दारूबंदीच्यामागणीसाठी संघटनेच्या अध्यक्षा प्रेमलता सोनोने यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन मुंडण करून आपल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
संग्रामपूर येथील तहसील कार्यालयासमोर दारूच्या बाटल्या समोर ठेवून योगा करताना अस्तित्व संघटनेच्या महिला सदस्या.
बातम्या आणखी आहेत...