आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगाव: मेहकर येथे गजानन सेवा समितीतर्फे भक्तांसाठी महाप्रसाद, संत नगरीमध्ये आज प्रगट दिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव - योगिराज श्री संत गजानन महाराजांचा उद्या १८ फेब्रुवारी रोजी १३९ वा प्रकट दिन असून त्यानिमित्त श्री गजानन महाराज संस्थानसह संत नगरी भाविक भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. प्रकट दिनानमित्त श्री च्या मंदिरात ११ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. तसेच आजपासून शहरात अनेकांच्या घरी निरनिराळ्या गावच्या भजनी दिंड्यांचे आगमन झाले आहे. त्यामूळे संतनगरीत चोहोबाजुने भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाल्याचे दिसून येत आहे. 
 
उद्या १८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मंदिरात सुरू असलेल्या महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती अवभृत स्नान ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात होणार आहे. त्यानंतर १० ते १२ या दरम्यान हभप विष्णुबुवा कव्हळेकर यांचे श्री च्या प्रगट निमित्त किर्तन होणार आहे. दुपारी दोन वाजता मंदिरातून श्री चा रजत मुखवटा असलेल्या पालखीची भव्य शोभायात्रा रथ, मेणा, गज अश्वासह शेकडो वारकऱ्यांच्या सहभागाने शहरातील पालखी परिक्रमा मार्गाने निघणार आहे. या महोत्सवानिमित्त मागील आठवडाभरापासून संतनगरीत दररोज राज्यातील शेकडो भजनी दिंड्या वारकऱ्यांसह श्री च्या दर्शनासाठी येत आहेत. प्रकट दिनी श्री च्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकगण संतनगरीत येणार आहेत. मंदिराच्या वतीने या महोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यातील शेकडो वारकऱ्यांच्या पायदळ दिंड्या संत नगरीच्या दिशेने आगेकूच करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक रस्ता महामार्गावर गण गण गणात बोतेचा गजर घुमत आहे. तसेच तसेच हा नयनरम्य सोहळा डोळयात साठविण्यासाठी श्री चे दर्शन घेण्यासाठी राज्यासह परराज्यातील लाखो श्री भक्त शहरात दाखल होत आहेत. 

राजीवगांधी आरोग्यदायी योजनेंतर्गत शेगावात उद्या रोग तपासणी शिबिर 
शेगाव राजीवगांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत ओमप्रकाश गोयनका यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त ओमप्रकाश रामगोपाल गोयनका फाउंडेशन आणि आइकॉन हॉस्पिटल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात १९ फेब्रुवारी रोजी रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १० वाजेपासून दुपारी वाजे पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात हृदय रोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, छातीविकार तज्ञ, दंत मुख कर्करोग तज्ञ, मधुमेह रोग तज्ञ, जनरल सर्जरी तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, किडनी मुत्रविकार तज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहेत. यावेळी डॉ. अभय गोयनका, डॉ. विनय अग्रवाल, डॉ. दिलीप भुतड़ा, आनंद पालडीवाल, बंटी मुरारका, उज्वल गोयनका हे उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा शहरासह परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

मेहकरात प्रगट दिनानिमित्त पारायण सोहळ्याला सुरूवात 
मेहकर - संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त १६ फेब्रुवारी पासून शहरात श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळ्याला सुरूवात करण्यात आली आहे. येथील बालाजी मंदिरात श्री बालाजी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील श्री भक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवहन आयोजकातर्फे केले आहे. 

भाविक भक्तांच्या सोयीसाठी आजपासून मंदिर रात्रभर खुलेे 
प्रकट दिन महोत्सवामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधेकरीता शुक्रवारी १७ फेब्रुवारीचे पहाटे पाच वाजतापासून १९ फेब्रुवारी रोजी रात्री गर्दी संपेपर्यंत मंदीर खुले राहणार आहे. तसेच भक्तांची गर्दी होवूनही मंदीरात भक्तांना सहज ये-जा करता यावे यासाठी मंदिर परिसरामध्ये एकेरी मार्ग सुरू करण्यात आला आहे. 

शेगाव - शुक्रमवारी १७ फेब्रुवारी सकाळपासून गजानन सेवा समितीच्या वतीने प्रकट दिन महोत्सवाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसाद वितरणास प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरूवात श्री च्या आरतीने करण्यात आली. 
 
नगराध्यक्षा सौ.शकुंतलाबाई बुच उपाध्यक्षा सौ.वर्षाताई ढमाळ यांच्या हस्ते श्री ची आरती करण्यात येवून महाप्रसाद वितरणास प्रारंभ करण्यात आला. श्री गजानन सेवा समिती नागपूर, अकोट शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक अग्रसेन भवन येथे श्री संत गजानन महाराजांचे वर्षातून होणारे ऋषिपंचमी, प्रकट दिन रामनवमी या तीन महोत्सवांच्या वेळी संतनगरीत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सलग तीन दिवस महाप्रसादाचे सकाळपासून रात्री उशीरा भाविक भक्त येईपर्यंत अविरत वितरण करण्यात येते. 

दरम्यान सात वर्षापासून या गजानन सेवा समिती हा उपक्रम राबवत असून येथील स्वच्छता नियोजन वाखाणण्याजोगे आहे. दररोज हजारो भाविक भक्त येथील महाप्रसादाचा लाभ घेत आहेत,अशी माहिती आयोजकांच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, दिंडीत सहभागी झालेले वारकरी.  दिंडीत सहभागी झालेले वारकरी... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...