आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकच्या धडकेमध्ये युवक जागेवरच ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रकच्या धडकेने दुचाकी रस्त्याच्या खाली गेली हाेती. - Divya Marathi
ट्रकच्या धडकेने दुचाकी रस्त्याच्या खाली गेली हाेती.
बोरगाव मंजू - राज्य महामार्गावर बोरगावमंजू पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या वाशिंबानजिक भरधाव ट्रकने एका मोटारसायकलस्वारास पाठीमागून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जबर धडक दिली. या अपघातात एका २३ वर्षीय युवकाचा जागेवरच करुण अंत झाला. ही घटना सोमवार, जानेवारीला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ट्रक चालकाविरुद्ध बोरगावमंजू पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रकसह चालकास अटक केली. बोरगावमंजूतील रेणुकानगर येथील रहिवासी प्रभाकर श्रीकृष्ण बोंबटकार, वय २३ वर्ष हा एमएच २७, टी ३२५९ या क्रमांकाच्या स्वत:च्या मोटारसायकलने बोरगावमंजूकडे येत होता. दरम्यान, अकोलावरून पाठीमागून डब्ल्यूबी २३ जे ०८७९ क्रमांकाचा ट्रक येत होता. 
 
ट्रक चालकाने मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकल चालक प्रभाकर बोंबटकार हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पी. के. काटकर, हेड कॉन्स्टेबल निसार खान, अनिल ऐन्नेवार, इंगळे, जुनगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून ट्रकसह चालकास अटक केली. सुधाकर बोंबटकार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार काटकर करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...