आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता गणवेशात न येणाऱ्या शिक्षकांचे वेतन राेखणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - शाळेत गणवेशात न येणाऱ्या शिक्षकांचे वेतन राेखण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात अाला. तसेच भिली येथे जि.प. शाळेतील एका प्रकरणात शाळा बंद ठेवणाऱ्या दाेन शिक्षकांची एक वेतन वाढ थांबवण्याचा निर्णयही सभेत घेण्यात अाला. 
 
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वितरीत करण्यात येणाऱ्या पाेषण अाहाराची मािहती अनेकदा सादर करण्याच्या सूचना शिक्षण समिती सभापती पुंडलीकराव अरबट यांनी दिल्या. त्यानंतर त्यांनी स्वत:ही अनेकदा शाळांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीत प्रचंड अनियमितता पुढे अाली हाेती. त्यामुळे या मुद्यावर २२ अाॅगस्ट राेजी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत चर्चा करण्यात अाली. शालेय पाेषण अाहार अधीक्षकांनी जुलै महिन्यात काेणत्या शाळंना भेटी दिल्या, याचा अाढावा सादर करण्याचा अादेश सभापतींनी दिला. तसेच तेल्हारा अाकाेट येथील पाेषण अाहाराची मािहती सादर करण्यात नसल्याने संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्याची सूचना त्यांनी दिली.सभेत उपकराच्या याेजना, नस्तीची स्थिती, वाॅटर प्युरीफायर, डेस्क बेंच खरेदी, टाय बेल्ट वितरण, अाेळख पत्र तयार करणे क्रिडा याेजनांवर चर्चा केली. सभेत सभेला सदस्य अक्षय लहाने, प्रतिभा अवचार, ज्याेत्सना चाेरे, संताेष वाकाेडे, मनाेहर हरणे यांच्यासह अधिकारी अादी उपस्थित हाेते. 
 
लवकरच कार्यवाहीचा बडगा 
बाळापूर तालुक्यातील माेरझडी येथील शाळेतील शिक्षक जकाते यांना कारणे दाखवा नाेटीस बाजवून काेणती कार्यवाही करण्यात अाली, असा सवाल सभेत उपस्थित करण्यात अाला. तसेच गट शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांचा घरभाडे भत्ता थांबवला काय, असा सवालही त्यांनी केला. सभापतींनी दिलेल्या भेटीत शाळेत अनियमितता अाढळून अाली हाेती. शिक्षिका गिताबाली उनवणे यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही का करण्यात अाली नाही, सहाय्यक अध्यापिका दिपाली भगत यांची चाैकशी करण्यात अाली काय, सहाय्यक अध्यापक कल्पना भटुरकर प्रशासकीय कार्यवाही करण्यात अाली काय, असे सवाल सभेत उपस्थित करण्यात अाले. 
बातम्या आणखी आहेत...