आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचे वेतन बंद करण्याच्या हालचाली; जि.प. शिक्षण भरती प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- जिल्ह्यात मे २०१२ नंतर करण्यात अालेल्या माध्यमिक शिक्षक पदभरती प्रकरणी साेमवारी जवळपास १८ शिक्षकांचे वेतन बंद करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. या शिक्षकांना बजावण्यात येणाऱ्या नाेटीस तयार करण्यात अाल्या अाहेत.
 
मे २०१२मध्ये शिक्षक भरतीबाबतचा शासनाकडून जारी करण्यात अाला हाेता. १०० टक्के समायाेजन झाल्याशिवाय रिक्त पदांवर भरती करण्यात येऊ नये, असे निर्णयात नमूद केले हाेते. मात्र काही खासगी शैक्षणिक संस्थांनी भरतीबाबतच्या जाहिरातीस ना हरकत प्रमाणपत्र घेता भरती केल्याचे उजेडात अाले हाेते. या पदांना वैयक्तिक मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात अाले. काही ठिकाणी जिल्हा परिषद सीईओ, शिक्षण अायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन खासगी शाळांमध्ये पद भरतीसाठी परवानगी देण्यात अाली हाेती. मात्र अशा पदभरतीस परवानगी देताना शाळांतील कर्मचारी विनियमन अधिनियमातील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्यास अतिरिक्त पदे असल्यास पदभरती करता येणार नाही, अशीही सूचना देण्यात अाली हाेती.
 
अादेशाला फासला हाेता हरताळ : शिक्षकभरतीबाबतच्या एका प्रकरणात उच्च न्यायालयाने निर्णय जाहीर केल्यानंतर शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या उपसचिवांनी अादेश जारी केला हाेता. या अादेशाची प्रत जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवण्यात अाली हाेती. मात्र अादेशाला तिलांजली देत शिक्षक भरती झाली हाेती.
 
४८ शिक्षकांवर टांगती तलवार
शिक्षण भरती प्रकरण उजेडात अाल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने चाैकशी केली. शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांच्या दस्तावेजांची पडताळणी केली. अनेकांचे जबाब नोंदवण्यात अाले. याबाबत ४७ शिक्षकांना नाेटीस बजावण्यात अाल्या हाेत्या. शिक्षकांनी अापले म्हणणे मांडले. जाहीरात प्रकाशित झाल्याने भरती प्रक्रियेची माहिती मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले हाेते.
बातम्या आणखी आहेत...