आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनेरीक मॉलचा स्तूत्य उपक्रम ‘नाम’ राज्यभरामध्ये पोहचवणार, सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉलचे उद्घाटन करताना मकरंद अनासपुरे, आमदार राहुल बोंद्रे. - Divya Marathi
मॉलचे उद्घाटन करताना मकरंद अनासपुरे, आमदार राहुल बोंद्रे.
चिखली - राजकारण करताना आपण समाजाचे काही देणे लागते, ही जाण ठेवून राजकारण करणारे लोक विरळेच असतात. आमदार राहूल बोंद्रे त्यापैकी एक आहेत हे त्यांच्या कार्यावरुन दिसून येते. गोरगरीब रुग्णांसाठी सर्वाधिक स्वस्त मात्र गुणवत्तेत किंचीतही कमी नसलेली जेनेरिक औषधी जनतेला उपलब्ध करुन देण्याचे काम सिद्धीविनायक मेडीकल माॅल समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केले आहे. त्यांचा हा प्रकल्प त्यांचे परिणाम पाहून नाम फाऊंडेशन हा प्रकल्प संपूर्ण राज्यभर राबवण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते नाम फाऊंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केले. 
 
गरजू रुग्णांना स्वस्तातले अन उच्चप्रतिचे जेेनेरिक मेडीसीन उपलब्ध करुन देण्यासाठी सिद्धीविनायक माॅलचे उदघाटन अनुराधा बँकेंसमोर मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते आज पार पडले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हदयरोग तज्ञ डाॅ. सुरेश छाजेड हे तर राधेशाम चाडंक, राजेंद्र गुप्ता, डाॅ. अजाबराव वसू, राजेंद्र काळे, आमदार राहुल बोंद्रे, डाॅ. व्हि. आर. यादव, माजी आमदार जनुभाऊ बोंद्रे, बाबुराव पाटील, हिरकणी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ. वृृषालीताई बोंद्रे, आत्माराम देशमाने, सिद्धेश्वर वानेरे, प्राचार्य डाॅ. के. आर. बियाणी, डाॅ. आर. एच. काळे, अरुण नन्हई यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले की, जेनेरिक औषधीची माफक दरात जनसामान्यासाठी उपलब्धता करुन देण्याचे एक चांगले सामाजिक कार्य आहे. याचा अनेक रुग्णांना लाभ होणार आहे. तर आमदार राहुल बोंद्रे यांनी यामाध्यमातून कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी जो रुग्णसेवेचा विचार दिला त्यानेच प्रेरीत होउन हा समाजसेवेचा उपक्रम आम्ही हाती घेतला असे सांगीतले. त्यानंतर डाॅ. सुरेश छाजेड, राधेशाम चांडक, राजेंद्र काळे यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्तविक प्राचार्य ियाणी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन प्रा. उन्मेष जोशी गणेशकर यांनी केले. 
 
बातम्या आणखी आहेत...