आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूलभूत सुविधा, तक्रारींचे अॅप्सद्वारे हाेणार निवारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राजकीय पुढारी एखाद्या विषयात तज्ज्ञ असेल निष्णांत असेल, तर त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळतो. याचा पुन्हा एकदा प्रत्यय अकोलेकरांना मिळाला आहे. विविध ‘हाय-टेक’ प्रणालींची अंमलबजावणी करणाऱ्या उपमहापौर विनोद मापारी यांनी आता मूलभूत सुविधांच्या तक्रारींसह विविध सुविधांचा लाभ अकोलेकरांना घरबसल्या घेता यावा, यासाठी आपला सेवक या नावाने मोबाइलमध्ये अप्लिकेशन सुरू केले आहे.
हायटेक प्रणालीच्या वापराबाबत हातखंडा मानल्या जाणाऱ्या विनोद मापारी यांनी यापूर्वी सेन्सरने पथदिवे सुरू करणे, मोबाइलच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू, बंद करणे, जीपीएस प्रणालीचा वापर करून वाहनांवर नियंत्रण मिळवणे आदी यशस्वी उपक्रम महापालिकेत राबवले आहेत. मोरी वॉटर, कोंडवाडा विभागाची वाहने आदींवर जीपीएस प्रणाली बसवल्याने ही वाहने दिवसभरात कुठे-कुठे फिरली? याची माहिती मोबाइलच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे इंधनात होणाऱ्या भ्रष्टाचाराला काही प्रमाणात का होईना, आळा बसला आहे.

या सुविधाही उपलब्ध
अप्लिकेशनवर शहरातील आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, रक्तपेढी, अकोला महापालिका, फायर ब्रिगेड, वीज वितरण केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध अधिकाऱ्यांचे दूरध्वनी तसेच शहराच्या सर्वच भागातील सर्पमित्रांचे मोबाइल क्रमांक त्यांच्या पत्त्यासह उपलब्ध आहेत.
अप्लिकेशनमध्ये या सुविधा उपलब्ध

Á शहरातील ताज्या घडामोडी
Á मूलभूत सेेवासंबंधी सेवा तक्रारी
Á वार्तालाप-सूचना
Á नि:शुल्क नोंदणी होणारे फायदे
Á एक क्लिक करा आपले बिल भरा
Áरोजगाराशी निगडित उपलब्ध संधी
Á अकोला मनपा संबंधित माहिती

अकोलेकरांनी लाभ घ्यावा
^शिवसेनेच्या८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणानुसार मी काम करत आहे. या अॅपद्वारे शहरातील नागरिकांना मूलभूत तक्रारींचा निपटारा घरबसल्या करता यावा, त्याच बरोबर विविध सुविधाही मिळाव्यात, या हेतूने ही सेवा सुरू केली आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा लवकरात लवकर करण्याचा माझा प्रयत्न राहीन. सर्वसामान्य नागरिकांना या अॅप्सचा उपयोग होईल, अशी मला खात्री आहे. अकोलेकरांनी अॅप्सचा उपयोग घ्यावा. विनोद मापारी,