आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: ‘आयजीं’चे पथक तक्रारदार बनून पोहोचले पोलिस ठाण्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अमरावती परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी विशेष पथक गठित केले आहे. या पथकातील कर्मचारी डमी तक्रारदार म्हणून पोलिस ठाण्यात तक्रारी देतात. यावेळी त्यांच्यासोबत पोलिसांचा व्यवहार कसा आहे. यासंबधीचा गोपनीय अहवाल तयार केल्या जात आहे. यात दोषी आढळणाऱ्या पोलिस ठाणे तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर नंतर कारवाई केल्या जाणार आहे. असेच हे पथक शहरातील पोलिस ठाण्यात अचानक जात आहे. दोन युवती तिचा वडिल असे डमी तक्रारदार बनून त्यांनी खदान पोलिस ठाण्यात धडक दिली होती. 
 
पोलिस ठाण्यात तक्रारदार गेल्यास त्यांची तक्रार घेतल्या जात नाही. पोलिसांकडून तक्रारदारांवर प्रश्नांची सरबत्ती होत असल्याने शक्यतो व्यक्ती तक्रार देण्यास धजावत नाही. असे अनेकांना अनुभव असतात. त्यासाठी आपल्या परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पोलिस ठाण्यात डमी तक्रारदार पाठवून चौकशी करण्यात येत आहे. हे पथक कोणत्या पोलिस ठाण्यात जाईल, याचे काही निश्चित नसल्याने पोलिस कर्मचारी यापासून अनभिज्ञ आहेत. 
 
खदान पोलिस ठाण्यात एक अधिकारी दोन महिला पोलिस कॉन्स्टेबल डमी तक्रारदार बनून पोहचल्या. माझे जेतवन नगरमधील राठोड नावाच्या युवकासोबत अफेअर आहे. मात्र त्याने आता लग्नाला नकार दिला आहे. माझ्याकडील काही मौल्यवान वस्तुही त्याने घेतल्या असून मलाच धमकावत असल्याचे डमी युवती बनून आलेल्या महिला पोलिस कर्मचारीने ठाणे अंमलदारास सांगितले. यावेळी तिची डमी बहीण शेजारी उभी होती. तर पोलिस अधिकारी तिच्या वडिलांच्या भुमिकेत काही अंतरावर उभा होता. तक्रार ऐकल्यानंतर ठाणे अंमलदाराने तत्काळ जेतवन नगरमध्ये राठोड नावाची व्यक्ती नसल्याची खात्री बीट जमादाराकडून केली आणि युवतीला पोलिसांसोबत युवकाचे घर दाखवण्यासाठी जाण्याचे सांगितले. पोलिसांनी युवतीसोबत समाधानकारक व्यवहार केल्याचा अनुभव आल्याने पथकाने दुसऱ्या पोलिस ठाण्याकडे आपला मोर्चा वळवला. 
 
डॉ. जाधव यांची पोलिस ठाण्यांवर नजर 
पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांची विभागातील प्रत्येक पोलिस ठाण्यावर नजर असल्याचे यानिमित्ताने समोर आले. पोलिसांनी तक्रारदारासोबत चांगले वर्तन ठेवावे. त्यांची समस्या जाणून घेऊन, त्यांचे समाधान करावे. पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रारदारासोबत चांगली वागणूक ठेवावी, यासाठी हे पथक असल्याची माहिती आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...