आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन मूग, उडीद बाजारात आल्याने रौनक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अडत कोणी द्यावी, शेतकरी की व्यापारी यावरुन मध्यंतरी वादंग झाल्याने बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला होता. परंतु आता बाजार स्थिरस्थावर होतो आहे. नवीन मूग मोठ्या प्रमाणात तर उडीदही बाजारामध्ये येऊ लागल्याने रौनक वाढली आहे. नवीन मुगाची येथील बाजार समितीमध्ये दररोज आवक ४०० ते ५०० क्विंटलची आहे. आणि मुगाला ४००० ते ४६५० रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळतो आहे.
बाजारामध्ये येणाऱ्या मुगाचा आेलावा १३ टक्के असला पाहिजे. ताे सध्या १५ ते २० टक्केच्या आसपास आहे. त्याचा परिणाम प्रतवारीवर होतो आहे. तसेच डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्याच्यादृष्टीने शासनाने डाळींची आयात मोठ्या प्रमाणात केली. तसेच राजस्थानमध्ये मुगाचे उत्पादन चांगले झाल्याने चढे भाव होण्याची शक्यता नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन उडीदाचा श्रीगणेशा बाजारपेठेत झाला आहे. बाजार समितीमध्ये ५-१० पोती आवक सुरू आहे. उडीदही आेल्या स्वरुपात येत असल्याने त्याला मिळणारा सध्याचा भाव ७०००-७५०० रुपये प्रती क्विंटल आहे. येत्या काळात उडीदाची आवक निश्चितच वाढेल आणि भविष्यात ६००० रुपयांच्या जवळपास राहील, असा विश्वासही व्यापारी व्यक्त करत आहेत. जुन्या तुरीचे भाव निम्नस्तरावर ५२००-५४०० रुपये झाले होते. परंतु गेल्या दोन तीन दिवसांत १० टक्के तेजी आल्याने ५८००-६२०० रुपये भाव झाले आहेत. त्याचप्रमाणे हरभऱ्याचे भाव ५७००-६२०० झाले होते. त्यातही १५ टक्के तेजी आल्याने भाव ६७००-७००० झाले आहेत. डाळींचे ठोक भाव याप्रमाणे आहेत. तुरडाळ (३ नंबर) ७०००-७५००, तुरडाळ (सव्वा नंबर) ८०००-८५०० रु., तुरडाळ (फटका) ९०००-९५०० रु., विना पॉलिश केलेली तुरडाळ ९७००-१०,००० रु., हरभरा डाळ ८५००-९३०० रु., मूग डाळ छिलका ५३००-५७०० रुपये पर्यंत, मूग मोगर ६१००-६४०० रुपये, उडीद डाळ छिलका ९०००-९७०० रुपये, उडीद मोगर ११०००-१३००० रुपये प्रती क्विंटल आहे. कडधान्य, डाळीमध्ये पहिल्यापेक्षा २० ते ३० टक्के भाव कमी झाले आहेत, अशी माहितीही देण्यात आली.

आयात आणि नियंत्रणामुळे भाव आटोक्यात
^मध्यंतरी डाळींचे भाव वाढले होते. परंतु शासनाने केलेली डाळींची आयात आणि नियंत्रणामुळे भाव खाली आले आहेत. बाजारामध्ये चालना मिळण्यास याचा फायदा होईल.'' आेमप्रकाश गोयनका, उपाध्यक्ष, ग्रेन मर्चंट असोसिएशन, अकोला.
बातम्या आणखी आहेत...