आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद करणारे व्यापारी स्थानबद्ध, १४ दुकानांचे स्थलांतर १० प्रस्ताव तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गोरक्षण रोडवरील दारू दुकान हटवण्यासाठी गुरुवारी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेत अांदाेलन केले. या वेळी व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी करत रस्ता बंद केला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली हाेती. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण मिळवले. आंदोलनकर्त्यांचे उग्र रूप पाहून पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. आंदोलनकर्त्यांना खदान पोलिस ठाण्यात अाणण्यात अाले होते. दुपारी त्यांना सोडून दिले. 
 
महामार्गावरील बंद झालेली दारूची दुकाने, बिअर बार आता इतरत्र स्थलांतरीत करण्यात येत आहेत. त्यामुळे मिळेल तिथे जागा घेऊन ही दुकाने लावण्याचा प्रयत्न परवानाधारक दारूविक्रेते करत आहेत. शहरात आता बोटावर मोजण्याइतके दुकाने सुरू आहेत. त्यापैकीच गोरक्षण रोडवर आता तीन दुकाने बार आहेत. त्यातच आणखी इन्कमटॅक्स चौकात एक दुकान स्थलांतरीत केल्याने या परिसरातील नागरिकांनी त्यांना तीव्र विरोध दर्शवला. या परिसरातून दुकान हटवण्यासाठी गोरक्षण रोड दारू दुकान हटाव संघर्ष समिती गठित केली आहे. संघर्ष समितीने स्थानिकांच्या मदतीने यापूर्वी आंदोलन केले. चार दिवसापूर्वी संघर्ष समितीने व्यापाऱ्यांसोबत एक मिटिंग केली होती. त्यात ठरल्यानुसार गुरुवारी सकाळी संघर्ष समितीने उग्र रूप धारण केले. 
 
येथील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन सकाळी दुकाने बंद करून दारू दुकान हटावच्या घोषणा दिल्या आपली दुकाने दिवसभर बंद ठेवली. हे आंदोलन संघर्ष समितीचे विनायक पवार, निशिकांत बडगे, अजय गावंडे, पंकज जायले, प्रवीण देशमुख, ओंकार शुक्ला, पंकज साबळे, प्रशंात प्रधान, मनीष राठोड,हर्षल भोंबळे, रोहीत सरोदे,भैया खाडे, अजिंक्य गावंडे, वैभव तायडे, अनिल बोराखडे, बाळ काळणे, रवि जोशी दुकानदारांनी केले तर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

राष्ट्रीय आणि राज्य रस्त्यापासून पाचशे मीटरच्या आतील दारुची दुकाने आणि बार बंद केल्यानंतर िजल्ह्यातील सुमारे १४ दुकानांनी स्थलांतर केले आहे. यात देशी आणि िवदेशी मद्याची प्रत्येकी तीन दुकाने असून आठ बार आहेत. आणखी किमान १० प्रस्ताव तयार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने म्हटले आहे. या सर्व प्रस्तावांमध्ये पर्यायी जागेची निवड करण्यात आली अाहे. िजल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर त्याबाबतचा निर्णय होणार आहे. बंदी आदेशातून सुट मिळालेली तीस दुकाने पूर्वीपासूनच सुरु होती. िजल्ह्यात सध्या सुरु असलेली एकूण दारु दुकाने आणि परमीट रुम मधील १४ दुकाने ही अकोला महानगरपािलकेच्या हद्दीत आहेत. जुनी दुकाने बंद करुन दुसऱ्या िठकाणी स्थानांतरण केले जातात, त्यालाही नियम आहेत. धार्मिक प्रार्थना स्थळे आणि शैक्षणिक दालने यापासून िवशिष्ट अंतर राखूनच ही परवानगी देता येते. त्यामुळे आतापर्यंतची कारवाई नियमांचे पालन करुनच झाली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक राजेश कावळे यांनी दिली. 

तगडा पोलिस बंदोबस्त 
सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याचे ठाणेदार अन्वर एम. शेख यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. खदान सिव्हिल लाइन्स पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात केला होता. पोलिसांनी लगेच या मार्गावर झालेली वाहतुकीची कोंडी सोडवली, तर ठाणेदार अन्वर एम. शेख यांनी यांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली त्यांची नंतर सुटका केली. दिवसभर गोरक्षण रोडवर पोलिस बंदोबस्त होता. अांदाेलन चिघळू नये, म्हणून पाेलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले हाेते. दुपारी ताब्यात घेतलेल्यांना साेडून देण्यात अाले. 

द्वारकानगरीतील देशी दारूचे दुकान हटवण्याची मागणी 
द्वारकानगरीतील चायना गेट नावाचे देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी येथील नागरिकही सरसावले आहेत. येथे येणाऱ्या दारूड्यांमुळे महिला, लहान मुले मुलींना प्रचंड त्रास होत आहे. रस्त्यावर पिवून पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहेत. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी येथील दारूचे दुकान हटवा, अशी एकमुखी मागणी येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीच्या प्रती पालकमंत्र्यांनी देण्यात अाल्या अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...