आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-शिवसेना युती बिघाडीचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यातीलनगर पालिका नगराध्यक्ष पदाच्या िनवडणुकीत भाजप- िशवसेना युतीमध्ये िबघाडी हाेण्याचे संकेत प्राप्त झाले अाहेत. एकीकडे बुधवारी भाजपने सर्वच जागांसाठी मुलाखती घेऊन यादी मंजुरीसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली अाहे, तर दुसरीकडे िशवसेनेही बहुता:श उमेदवार िनश्चित करुन यादी मुंबईतील नेत्यांकडे पाठवली अाहे.

भाजपतर्फे पाच नगर पालिकांसाठी नगराध्यक्ष, ११३ प्रभाग प्रभागाकरिता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी घेतल्या. भाजप कोर कमिटीने पॅनलनिहाय यादी मान्यता घेण्यासाठी प्रदेश कार्यालयात पाठवली अाहे. येत्या दोन दिवसात भाजप प्रचार अभियान सुरु करणार आहे. काही ठिकाणी मित्र पक्ष तसेच स्थानिक आघाड्यांसोबत युती होण्याची शक्यता लक्षात स्थािनक नेत्यांनी वर्तवली अाहे. मात्र पक्षाने मोर्चेबांधणी करून नगर परिषदांवर भाजपाचा झेंडा रोवण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखली आहे. मुलाखती खासदार संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शीला खेडकर, रामदास तायडे, रवी गावंडे, बाबुराव शेळके, श्रीकृष्ण मोरखडे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भाजपा प्रदेश पार्लमेंट बोर्डाची मान्यता मिळाल्यावर २७ किंवा २८ ऑक्टोबर रोजी पक्षाच्यावतीने उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे.

शिवसेनेतर्फेतालुक्यात मुलाखती:
िशवसेनेनेप्रत्येक तालुक्यात जावून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नगर पािलकािनहाय िवचार करुन उमेदवार िनश्चित करण्यात अाले. नवनियुक्त िजल्हाप्रमुख तथा िजल्हा परिषद सदस्य िनतीन देशमुख यांनी गत अाठवड्यातच तालुका, शहर प्रमुखांची िनवड केल्यानंतर त्यांनी बैठकांचे सत्र सुरु केले. नगराध्यक्षांसह सर्वच प्रभागांमधील उमेदवार निश्चित झाले अाहेत. बुधवारी पातूर येथे भाजपयुमाेचे िजल्हा उपाध्यक्ष मंगेश गाडगे यांनी िशवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेसनेमणार िनरीक्षक: प्रचार-प्रसार, रूसवे फुगवे िनयंत्रणासाठी काॅंग्रेस जवळच तालुकानिहाय िनरीक्षक नेमणार अाहेत. काॅंग्रेसनेही सर्वच नगर पािलकांमधील प्रभागांसाठी उमेदवारांची यादी निश्चित केली अाहे. ही यादी पक्षश्रेष्ठींकडे मान्यतेसाठी पाठवली. मात्र, कांॅग्रेस स्थािनकस्तरावर धर्मनिरपेक्ष पक्षांसाेबत अाघाडी करण्याच्या िवचारात अाहे. तेल्हारा, बाळापूर, अाकाेटमध्ये प्रयत्नही सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.

भाजपच्यामुलाखती: भाजपच्याकार्यालयात ७३२ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यात नगराध्यक्ष पदासाठी ५२ उमेदवारांच्या मुलाखीत झाल्या. ६० महिलांच्या ६० जागांसाठी ३४८, सर्वसाधारण ३१ जागांसाठी २०५, इतर मागास वर्गाच्या १४ जागांसाठी ७५, अनुसूचित जातीच्या जागांसाठी ३५ तर अनुसूचित जमातीच्या जागांसाठी १० उमेदवारांच्या मुलाखती उशिरा रात्री पर्यंत घेण्यात अाल्या.

सर्वच जागांसाठी भरण्यात येणार अर्ज
Ãजिल्हयातीलसर्वचनगराध्यक्ष तसेच ११३ प्रभाग प्रभागाकरिता मुलाखती घेण्यात अाल्या असून, सर्वच िठकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार अाहे. यादी मान्यतेसाठी पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात अाली अाहे. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. तेजरावथाेरात, िजल्हाध्यक्ष भाजप

वेळ पडल्यास स्वबळाची तयारी
Ãशिवसेनेनेतालुकानिहायबैठाका घेऊन उमेदवारांची नावे िनश्चित केली. यादी संपर्क प्रमुखांकडे मान्यतेसाठी पाठवली. पक्षश्रेष्ठींच्या िनर्णयाचे िजल्ह्यात स्वागत पालन केले जाईल. मात्र वेळ पडल्यास स्वबळावर िनवडणूक लढण्याची तयारी िशवसेने केली. िनतीनदेशमुख, िजल्हाध्यक्ष, िशवसेना.
बातम्या आणखी आहेत...