आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकू या, पुढे जाऊ या, नववीत अनुत्तीर्ण हाेणाऱ्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला : इयत्तावीमध्ये अनुत्तीर्ण हाेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी हाेण्यासाठी द्रुतगती शिक्षण पद्धती राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने शनिवारी घेतला. ही पद्धती राबवण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात अाल्या अाहेत. या पद्धतीद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती राेखणे शक्य हाेईल, असा दावा शासनाकडून करण्यात येत अाहे. 
 
समाजातील शेवटच्या घटकाच्या घटकातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, असा कार्यक्रम तयार करण्यात अाला. हा कार्यक्रम राबवण्यासाठी शिक्षण विभागाने काही उद्दिष्टे पुढे ठेवली हाेती. त्यानुसार कार्यक्रमाच्या सकारात्मक बाबीही पुढे अाल्या हाेत्या. हा कार्यक्रम प्रथम प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात अाला. दरम्यान, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती राेखण्यासाठी शासनाने प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमच्या धर्तीवरच जलदगतीने शिक्षण पद्धती राबवण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे किमान ते वर्षांची शिक्षणाची तूट भरुन निघेल, असा विश्वास शासनाला अाहे. 
 
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आला निर्णय 
कक्षाची स्थापना हाेणार : विद्या प्राधिकरणाअंतर्गत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियनाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची गळती कमी करण्यासाठी येणार असून, यासाठी जलदगतीने शिक्षण या नावाने कक्ष स्थापना करण्यात येणार अाहे. कक्ष माध्यमिक स्तरावरील अनुत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे ट्रॅकिंग तयार करणार अाहे. तसेच मुलांना अावश्यक असणारे क्लिष्ट विषयातील संबाेधांसाठी अॅान लाईन रिसाेर्स रिपाेझिटरी तयार करण्यात येणार अाहे. हे साहित्य कक्षाकडून संबंधित शिक्षकांना उपलब्ध करुन देण्यात येणार अाहे. इयत्ता ९वी अाणि इयत्ता १०वीमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेल्या शाळांचा शासनस्तरावरून विशेष सन्मान करण्यात येणार अाहे. 
 
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, विद्या प्राधिकरणातर्फे प्रशिक्षण 
इयत्ता ९वीत बहुतांश विद्यार्थी हे गणित, इंग्रजी विज्ञान या विषयांमध्ये अनुत्तीर्ण हाेत असल्याचे दिसून येते. या विद्यार्थ्यांवर एप्रिल २०१७ अथवा जुलैमध्ये उत्तीर्ण हाेण्यावर लक्ष देण्यात येणार अाहे. यासाठी जलदगतीने शिक्षण पद्धतीद्वारे नियाेजन करण्यात येणार अाहे. विद्यार्थी अनुत्तीर्ण हाेणाऱ्या शाळेतील शिक्षकांसाठी जलद गतीने शिक्षण पद्धतीबाबत प्रशिक्षणाचे अायाेजन करण्यात येणार अाहे. हे प्रशिक्षण राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान विद्या प्राधिकरणातर्फे देण्यात येणार अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...