आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Niranjanakumar Goenka, Jugalakisor Rungta File Cases Against

निरंजनकुमार गोयनका, जुगलकिशोर रुंगटा यांच्यावर गुन्हे दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भारतीयसेवा सदन संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका (वय ८०) सचिव जुगलकिशोर रुंगटा (वय ७०) या जाेडीने संस्थेतील स्व. राधादेवी गोयनका महाविद्यालयात नाेकरीत कायम करण्याचे अामिष दाखवून लैंगिक शाेषण केल्याची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात युवकाने दिली होती. पीडित युवकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
स्व. राधादेवी गोयनका महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहात बगिच्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या युवकाला नाेकरीत कायम करण्याचे अामिष दाखवून २००८ पासून संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका सचिव जुगलकिशोर रुंगटा हे त्या युवकासाेबत अनैसर्गिक कृत्य करीत हाेते. या बलात्काराची चित्रफीत पीडित युवकाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना दाखवली होती. पत्रकार परिषदेत पीडित युवक संस्थेच्या विद्या मंदिर शाळेचे माजी मुख्याध्यापक गणपतराव आंबिलवादे यांनी अनेक गौप्यस्फोट केले.

पीडित युवकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, माझे वय २७ आहे. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून, मी नोकरीच्या शोधात होतो. मित्राच्या ओळखीने मला २००८ मध्ये श्रीमती रा. दे. गो. महिला महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात निरंजनकुमार गोयनका आणि जुगलकिशोर रुंगटा यांनी ४० रुपये उर्वरितपान. १०

रोजप्रमाणेरोजंदारीवर कामावर घेतले. त्यानंतर त्यांनी मला नोकरीत कायम करतो, म्हणून एके दिवशी प्रोफेसर क्वॉर्टरमध्ये बोलावून घेत दोघांनीही शरीरसुखाची मागणी केली. त्याला नकार दिल्यानंतर त्यांनी जबरदस्ती केली. या वेळी धाक दाखवून दारू पाजून दाेघांनी माझ्यावर अनैसर्गिक बलात्कार केला. २००८ पासून जून २०१५ पर्यंत आपल्यावर आठवड्यातून एकवेळा या दोघांनीही सामूहिकपणे अत्याचार केल्याची तक्रार पीडित युवकाने पोलिस ठाण्यात केली.
पोलिसांनी युवकाचे बयाण घेऊन मंगळवारी निरंजनकुमार गोयनका जुगलकिशोर रुंगटा या दोघांविरुद्ध भादंवि ३७७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वयोवृद्ध संस्थाचालकांच्या या कृत्यामुळे शिक्षण क्षेत्राला काळिमा फासला गेला अाहे.
चित्रफीत दाखवली
युवकावरसातत्याने हाेणारे अत्याचार तसेच नोकरीसाठी झुलवत असल्यामुळे युवक त्रस्त झाला होता. त्यामुळे या अनैसर्गिक कृत्याचे त्याने स्वत:च स्टिंग करीत व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ घटनेचा पुरावा म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी चित्रफीत पाहून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.