आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Niranjanakumara Goenka And Jugalakisora Rungta Of Bail Problem

गोयनका-रुंगटा यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भारतीयसेवा सदन या शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका आणि माजी सचिव जुगलकिशोर रुंगटा यांच्या जामीन अर्जावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. या वेळी न्यायालयात सरकार पक्ष आणि आरोपी पक्षाचा युक्तिवाद झाला. त्यानंतर दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून, त्यांना पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले आहेत.

निरंजनकुमार गोयनका आणि जुगलकिशोर रुंगटा यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. १५ दिवसांपासून दोघेही अंतरिम जामिनावर होते. सरकार पक्ष न्यायालयात पुरावे सादर करू शकल्यामुळे आरोपींच्या अंतरिम जामिनाला दोनवेळा पाच-पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. सोमवारी सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात सबळ पुरावे सादर करण्यात आले. त्यावरून न्यायालयाने या दोघांचाही अंतरिम जामीन नियमित करता जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच आरोपींनी सिव्हिल लाइन्स पोलिसांना शरण यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. महिनाभरापूर्वी एका २८ वर्षीय युवकाने त्याचे लैंगिक शोषण गोयनका आणि रुंगटा यांनी केल्याची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात दिली होती. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ८० वर्षीय निरंजनकुमार गोयनका आणि ७० वर्षीय जुगलकिशोर रुंगटा यांच्यावर युवकाचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. हा युवक २००८ पासून भारतीय सेवा सदन या संस्थेतील मुलींच्या वसतिगृहात रोजंदारीवर काम करत होता. त्याला नोकरीत कायम करण्याचे आमिष देऊन त्याच्यावर २००८ पासून जून २०१५पर्यंत सतत अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप युवकाने केला होता. मात्र, त्याला नोकरीत कायम करण्यात आल्यामुळे त्याने त्याच्यावरील आपबितीचा गौप्यस्फोट केला. आरोपींनी त्याच्यावर केलेल्या अत्याचाराची चित्रफीतच पोलिसांना सादर केली. चित्रफितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत गोयनका रुंगटा या दोघांवर गुन्हे दाखल केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले. त्यांनी जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालय,अकोला येथे अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळल्यामुळे दोन्ही आरोपींनी २० जुलै रोजी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. सुरुवातीला न्यायालयाने या दोघांचे वय बघता आणि सरकार पक्षाने पुरावे सादर केल्यामुळे त्यांना अंतरिम जामीन दिला होता. त्या जामिनाला पुन्हा ऑगस्ट रोजी न्यायालयाने १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, १० ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली असता, न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

सुप्रीम कोर्टात जाणार
जिल्हासत्र न्यायालयानंतर उच्च न्यायालयामध्ये गोयनका रुंगटा यांना जामीन नाकारण्यात आल्यामुळे आरोपी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. आरोपींना वरच्या न्यायालयात जाण्यासाठी वेळ मिळावा म्हणून २४ ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्यासाठी संरक्षण दिले आहे.
जुगलकिशोर रुंगटा