आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरुपम, केजरीवाल यांचा पुतळा जाळला, सर्जीकल स्टाइकवर संशय घेतल्याचा केला निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - भारतीय सेनेतील जवानांनी सिमापार केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त करणाऱ्या काँग्रेस नेते संजय िनरुपम, अाम अादमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे िशवसेनने बुधवारी शहरात दहन केले.

उरीतील हल्ल्याला चाेख उत्तर देत गत अाठवड्यात भारतीय जवानांनी पाक अतिक्रमित काश्मिरमध्ये घुसून सर्जिकल स्टाईक केले. सर्जिकल स्टाईकच्या माध्यमातून दहशवाद्यांचा खात्मा करण्यात अाला. मात्र, संजय िनरुपम यांनी सर्जिकल स्टाईकबाबत सरकारने पुरावे सादर करावेत; अन्यथा सर्जिकल स्टाईक बनाव अाहे, असेच म्हणावे लागते, असा अाराेप केला हाेता. तसेच अापचे नेते तथा िदल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सरकारने सर्जिकल स्टाईकबाबत अांतरराष्ट्रीय समुदायापुढे पुरावे सादर करण्याचे अावाहन केले हाेते. दरम्यान, सर्जिकल स्टाईकवर संयश व्यक्त करणाऱ्या नेत्यांचे िशवसेनेने बुधवारी सायंकाळी मदनलाल िधंग्रा चाैकात पुतळ्यांचे दहन केले. िशवसैनिकांनी या नेत्यांिवराेधात घाेषणाही िदल्या. अशा नेत्यांना भारतात राहण्याचा अधिकारी नाही, अशा शब्दात शिवसैनिकांनी हल्लाबाेल केला. अांदाेलनात िशवसेनेच्या अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, संघटक तरुण बगेरे, संताेष अनासने, गजानन चव्हाण, याेगेश िगते, शरद तुरकर, ससी चाेपडे, मनाेज बावीसकर, गणेश सारसे, राजेश वगाररे, धनंजय गावंडे, चेतन थामत, चेतन गाेंडाले, अमाेल देवके, अाेमप्रकाश काळपांडे, कुणाल िशंदे, प्रदीप गुरुखुद्दे, अाशु ितवारी, रवी सातपुते, रेमश गायकवाड, गाेटू अग्रवाल, दीपक रणबावरे अादी सहभागी झाले हाेते.
बातम्या आणखी आहेत...