आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन गडकरींनी घेतली विकासकामांची माहिती, आयुक्त लहाने यांच्यासाेबत दहा मिनिटे चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी अकोला दौऱ्यादरम्यान वसंत खंडेलवाल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या वेळी खासदार धोत्रे, आमदार शर्मा उपस्थित होते.
अकोला - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी जानेवारीच्या धावत्या दौऱ्यात वेळात वेळ काढून आयुक्त अजय लहाने यांच्याशी शहरातील विकासकामांची माहिती घेऊन अनेक सूचनाही केल्या. दहा मिनिटांच्या या चर्चेत शहर बस वाहतूक सुरू करण्याबाबत मदत करण्याचे आश्वासनही दिले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जानेवारीला शिवनी विमानतळावर आगमन झाल्यानंतर भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यादरम्यान, आयुक्त अजय लहाने यांनाही त्यांनी बोलावून घेतले. या वेळी नितीन गडकरी यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती घेऊन प्रस्तावित कामांबाबत माहिती घेतली. तसेच घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान यशस्वीरीत्या राबवण्याची सूचना केली. त्याच बरोबर प्लास्टिक निर्मूलनाबाबत विविध उपाययोजनाही सांगितल्या. यासाठी नागपूरला भेट देऊन प्लास्टिक निर्मूलनाची माहिती घ्यावी, असा सल्लाही दिला. त्याच बरोबर सलूनच्या दुकानात दररोज जमा होणारे केस संकलित करा, या केसांची विक्री होते, असा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला. शहर बस वाहतुकीवर चर्चा करताना बसेस जुन्या झाल्या असून, अमृत योजनेत शहर बस वाहतुकीसाठी निधी देण्याची आयुक्तांनी केलेली मागणी मान्य करून मदत करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले. दहा मिनिटांच्या या चर्चेत शहर विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. या वेळी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर आदी उपस्थित होते.