आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोंडअळीमुळे चोवीस बीटी कंपन्यांना नोटिस; सात दिवसांत खुलासा करण्यास कंपन्यांना बजावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- बीटी वाणामध्ये बोंडअळ्यांना प्रतिबंध घालण्याची क्षमता असतानाही जिल्ह्यात कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडळ्यांचा प्रादुर्भाव झाला असल्याने संबंधित २४ कंपन्यांना उत्पादन व विक्री परवान्याविरुद्ध कार्यवाही का प्रस्तावित करण्यात येऊ नये याबाबतच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान संबधित कंपन्यांना सात दिवसांच्या आत उत्तर सादर करण्याचे या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.

 
बीजी-२ तंत्रज्ञानाचा वापर करून सदर बीटी बियाणाची निर्मिती करण्यात आल्यामुळे कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणे अपेक्षित नाही. परंतु जिल्ह्यात क्रॉपसॅप अंतर्गंत किड सर्वेक्षणामध्ये बहुसंख्य कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. बीजी-२ वाणावर बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यासोबतच ही बाब जिल्हास्तरीय कापूस तक्रार निवारण समितीच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. क्षेत्रीय पातळीवर तक्रारींच्या अनुषंगाने केलेल्या पाहणीतही बोंडअळीचा प्रादुर्भाव निदर्शनास आला आहे. दरम्यान बोंडअळींना नैसर्गिक प्रतिरोध म्हणूनच बीटी बियाणांची निर्मिती करण्यात आली. परंतु या वाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने  शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान, फवारणीमुळे शेतकरी, शेतमजूरांचे झालेले मृत्यू यासाठी सदर सदोष बियाणे जबाबदार असल्याचे नोटिसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सदर कंपन्यांच्या उत्पादन व विक्री परवान्याविरुद्ध कार्यवाही का प्रस्तावित करू नये याबाबतचा खुलाला सात दिवसांत करण्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. खुलासा वेळेत सादर न केल्यास किंवा असमाधानकारक असल्यास कंपनीच्या उत्पादन व विक्री परवान्याविरुद्ध प्रस्ताव परवाना प्राधिकाऱ्यांकडे सादर करण्याचा इशाराही या नोटीसद्वारे बजावण्यात आला आहे. 


या कंपन्यांना बजावली नोटीस : कृषी विभागाच्यावतीने  अंकुर, आर्या, आदित्य सीड्स, बसंत अॅग्रो, बायर, बायोसीड्स बीटा, दप्तरी, ग्रीनगोल्ड, जेके सीड्स,  किर्तीमान, कृषीधन, महिको, मोन्सॅन्टो, नुजीविडू, पाटील बायोटेक, प्रवर्धन, राशी, सत्या, श्रीराम अॅग्री जीन, तुलसी, वेदा, यशोदा हाय सीड्स या कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान अजित व कावेरी या दोन कंपन्यांविरुद्ध कार्यवाही प्रस्तावित करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तांकडे करण्यात आला आहे.

 

कृषी खात्याचे अपयश : शेट्टी
कापसावरील बोंडअळीचा प्रादूर्भाव तसेच हमीभावा पेक्षा कमी भाव या अचानक अालेल्या समस्या नाही. बोंडअळीचे संकट हे कृषी खात्याचे अपयश असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा खासदार राजू शेट्टी यांनी अमरावती येथील पत्रकार परिषदेत केला.  बीटी कापसाचे वाण हे शेतकऱ्यांसाठी काही नवीन, काही वाणात दोष असू शकतात. कृषी विभागाने अभ्यास न करता नियोजन केल्याने अश्या प्रकारचे प्रश्न तयार होत असल्याचे शेट्टी म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...