आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचाराची तक्रार आता थेट करता येणार ‘एसीबी अॅप’वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दिवसेंदिवसमाहिती तंत्रज्ञानाचा विस्तार वेगाने होत अाहे. आता सर्वच व्यवहार ऑनलाइन होत असताना सर्वांच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे तक्रार करण्यासाठी वेळेची बचत म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता भ्रष्टाचाराविषयी तक्रारी करण्यासाठी एसीबी अॅप कार्यान्वित केले आहे.

आता एसीबीच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी एसीबीने टोलफ्री क्रमांक आणि ऑनलाइन तक्रारीचा पर्यायसुद्धा खुला केला अाहे. आता मोबाइल अॅप तक्रारदारांसाठी खुला केले आहे. त्यासाठी मोबाइलच्या इंटरनेट ब्राऊझरमध्ये www.acbmaharashtra.net कायमस्वरूपी हे अॅप सेव्ह करता येणार आहे. या साइटला भेट दिल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असे ओपन होऊन लाचेच्या मागणीची तक्रार, अपसंपदेची तक्रार, पदाचा दुरुपयोग, कार्यप्रणाली आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न असे ऑप्शन येतात. ही सर्व माहिती भरल्यानंतर शक्य असल्यास भ्रष्टाचार तक्रार समर्थनार्थ फोटो, ऑडिओ क्लिप किंवा व्हिडिओ पुराव्यासह अपलोड करता येते. त्यानंतर नावासह मोबाइल नंबर आणि सहा आकडी सत्यापन कोड टाकावा लागतो. अशी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपली तक्रार एसीबीकडे लगेच प्राप्त होते. त्यानंतर लगेच एसीबीकडून सहा अंकी कोड येतो.

पारदर्शी कारभारास चांगला पर्याय
भ्रष्टाचाराचीतक्रार केल्यास तिची वरिष्ठ पातळीवरून दखल घेतल्या जावी. तेथून कारवाईचे आदेश निघाल्यानंतर त्यावर कारवाई होते. हे ऑनलाइन टोलफ्री क्रमांक सुरू केल्यापासून एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्व तक्रारी ऑनलाइनच्या कार्यकक्षेत याव्यात म्हणून मोबाइल अॅप सुरू केले आहे.

भ्रष्टाचाराच्या तक्रारी कराव्या
नागरिकांकडेकुणी लाचेची मागणी केल्यास त्याची तक्रार लगेच एसीबीकडे करावी. तक्रारीसाठी आता अनेक पर्याय आहेत. तसे पुरावे असल्यास पाठवावे. कारवाई होईलच. तक्रारदारांनी ऑनलाइन तक्रारी आणि टोलफ्री क्रमांकाचा वापर करावा.'' उत्तमरावजाधव, पोलिस उपअधीक्षक, एसीबी अकोला