आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यासाठी मिळाले अाता 9 काेटी रुपये, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना; अाॅनलाईन अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - प्रधानमंत्री कृषी सिंचन योजननेअंतर्गत जिल्ह्याला काेटी ३५ लाख रुपये मिळाले असून, शेतकऱ्यांना अाॅक्टाेबरपर्यंत अाॅनलाईन पद्धतीने करावा लागणार अर्ज लागणार अाहे.
शेतकऱ्यांचे जीवनमान उचंवावे, ते अार्थिकदृष्ट्या सक्षक व्हावेत, यासाठी शासनाकडून विविध उपाय याेजना करण्यात येतात. याच उपायांचा एक भाग म्हणून सिंचनाचे क्षेत्र वाढावे, यासाठीही शासनाकडून काेट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येते. कमी पाण्यात जास्त क्षेत्र सिंचनाखाली यावे, यासाठी सूक्ष्म सिंचन याेजना राबवण्यात येत अाहे. केंद्र पुरस्कृत असलेली ही याेजना राज्य शासनामार्फत राबवण्यात येते. या याेजनेत राज्य शासनकडून निधी देण्यात येताे.
दरम्यान, सन २०१६-१७मध्ये राबवण्यात येणाऱ्या कृषि सिंचन याेजनेसाठीही शासनाने निधी मंजूर केला अाहे.

याबाबतचा अादेश कृषि अायुक्तलयाच्या फलाेत्पादन संचालकांनी शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यलयाला पाठविला अाहे. त्यानुसार कृषि विभागाने अाॅन लाईन अर्ज मागवण्यास प्रारंभ केला अाहे.

असे मिळेल अनुदान
{अवर्षण प्रवण क्षेत्र:- अल्पभूधारक शेतकरी :-६० टक्के इतर शेतकरी:-४५ टक्के
{ अवर्षण प्रवण क्षेत्राबाहेर:- अल्पभूधारक शेतकरी:-४५ इतर शेतकरी:-३५ टक्के

अशा अाहेत अटी
{शेतकऱ्यांच्या नावे ७/१२ ८- असावा.
{ शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी त्याची नाेंद ७/१२वर असावी.
{ सामुिहक सिंचनाची सुविधा असल्यास इतर संबंधितांचे करारपत्र गरजचे राहणार अाहे.
{ विद्युत पंपाकरिता कायमस्वरुपी विद्युत जाेडणी अावश्यक राहणार अाहे. यासाठी नजीकच्या काळातील विद्युत देयकाची प्रत अर्जसाेबत जाेडावी लागणार अाहे.
{ अनुदानाची रक्कम थेट बॅंक खात्यात जमा हाेणार असल्याने राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड, सहकारी बॅंकेत खाते असणे अावश्यक अाहे.
{पात्र शेतकऱ्यास हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ द्यावा
{ यापूर्वी संबंधित शेतकऱ्याने काेणत्याही याेजनेतून सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेतला नसावा.
बातम्या आणखी आहेत...